आ.आशुतोष काळेंचा सोमवार २८ एप्रिल रोजी जनता दरबार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी-अडचणी समजून घेवून त्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरु केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्यामुळे सोमवार (दि.२८) रोजी आ.आशुतोष काळे दुपारी ०२:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मतदार संघातील अनेक नागरिकांचे शासकीय कार्यालयांमध्ये विविध प्रकारची कामे अडलेली असतात. सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात जोपर्यंत आपले काम पूर्ण होत नाही तोपर्यंत चकरा माराव्या लागतात. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी २०१९ पासून शासकीय अधिकारी व जनता एकाच वेळी एकाच व्यासपीठावर आणून नागरिकांच्या समस्यांचा सोक्षमोक्ष लावीत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षापासून नागरिकांची विविध शासकीय कार्यालयात रखडलेली कामे झटपट होवू लागली आहे. सुरुवातीला जनता दरबारात एकाच वेळी सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले जात होते.परंतु समस्या घेवून येणाऱ्या नागरीकांची होणारी गर्दी पाहता त्यामध्ये अधिकची सुसूत्रता यावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी एकाच वेळी न बोलविता टप्या टप्याने विविध विभागाचे अधिकारी जनता दरबारात बोलविले जावून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात आहेत.त्याप्रमाणे सोमवार (दि.२८) रोजी दुपारी ०२.०० वाजता तहसील कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,

मृद व जल संधारण, जल नि:सारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आदी विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन कारण्यात आले आहे. वरील विभागाबाबत ज्या नागरिकांचे प्रश्न , अडचणी असतील ते प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्या असे आवाहन ना.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.