संजीवनी पॉलीटेक्निकच्या मेकॅट्रॉनिक्स विभागाला एनबीए मानांकन – अमित कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या मेकॅट्रॉनिक्स विभागाचे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एनबीए), नवी दिल्लीने आऊटकम बेस्ड एज्युकेशन निकषांनुसार मुल्यांकन करून पुढील तीन वर्षांसाठी मानांकन बहाल केले. संजीवनी पॉलीटेक्निकने शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई संलग्नित मेकॅट्रॉनिक्स ही ब्रंच महाराष्ट्रात सर्वात प्रथम सुरू केली होती. यामुळे हा विभाग महाराष्ट्रात एनबीए मानांकन प्राप्त करणारा पहिला व एकमेव ठरला आहे. आता या पॉलीटेक्निकचे सर्व विभाग एनबीए हे सर्वोच्च मानांकन प्राप्त विभाग ठरले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.संजीवनी पॉलीटेक्निकच्या या अभुतपुर्व उपलब्धीबाबत संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी चिफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू, प्राचार्य ए. आर. मिरीकर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश जाधव, एनबीए समन्वयक डॉ. के.पी. जाधव, विभाग प्रमुख प्रा. आय. के.सय्यद, राजिस्ट्रार नानासाहेब लोंढेे, विभागीय समन्वयक प्रा. आर.बी. शिंदे , इतर सर्व विभाग प्रमुख व डीन्स यांचे अभिनंदन करून नितिनदादा कोल्हे यांनी या सर्वांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.पत्रकात अमित कोल्हे यांनी म्हटले आहे की माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६ मध्ये प्रथमतः हे पॉलीटेक्निक मुल्यांकनासाठी सामोरे गेले तेव्हापासुन एनबीएच्या कसोटीला सामोरे जाणारे संजीवनी पॉलीटेक्निक हे महाराष्ट्रातील फार कमी संस्थांपैकी एक आहे. मेकॅट्रॉनिक्स विभाग २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासुन सुरू झाला. त्यामुळे एनबीए मानांकनाच्या कसोटीस पात्र होताच आता या विभागाने मुल्यांकन करून घेवुन एनबीए मानांकन प्राप्त केले.एनबीए मानांकन प्राप्त मेकॅट्रॉनिक्स विभागातील मागील तीन वर्षातील प्रवेश संख्या, उच्च विद्याविभूषित व अनुभवी असणारे शिक्षक , विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सलग तीन वर्षात उत्तिर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण, शिक्षकांनी आधुनिक ज्ञानवृध्दीसाठी पुर्ण केलेले परीसंवाद, सादर केलेले शोधनिबंध व कार्यशाळांची संख्या, कन्सलटन्सी, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य, सुसज्य प्रयोगशाळा , नामांकित कंपन्यांशी केलेले सामंजस्य करार, माजी विद्यार्थ्यांचे सध्या विविध कंपन्यांमधिल स्थान आणि संबधित कंपन्यांचा या विद्यार्थ्यांसंदर्भातील अभिप्राय, पालकांचा विभागासंदर्भातील अभिप्राय, अशा अनेक बाबींचा चढत्या कमानीचा अहवाल एनबीए कार्यालयाला सादर केला होता.

विशेष म्हणजे मागील तीन वर्षांमध्ये या विभागाच्या सर्व गरजु विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या नामांकित कंपन्यांमध्ये मिळवुन देण्यात आल्या, या उपलब्धीची एनबीए समितीने विशेष दखल घेतली. एनबीए कार्यपध्दतीनुसार एनबीए समितीने या विभागाने सादर केलेल्या सर्व बाबींची पुराव्यासहीत परीमानांनुसार पडताळणी केली आणि भेटीनंतर लागलीच एका महिन्यात या विभागाला पुढील तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन बहाल केल्याबाबतचे अधिकृत पत्र दिले.महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात अनेक पॉलीटेक्निक आहेत. परंतु फार थोड्या संस्था एनबीएच्या कसोट्यांना सामोरे जाण्याचे धाडस करतात. मात्र महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातुन आत्मविश्वासाच्या जोरावर २०१६ पासुन एनबीएच्या कसोट्यांना सामोरे जाण्याचे संजीवनी पॉलीटेक्निक धाडसी पावुल टाकित आहे. पुर्वीचे सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग आणि मेकॅट्रॉनिक्स विभाग एनबीए मानांकन प्राप्त झालेे आहे. सध्या आवुटकम बेस्ड एज्युकेशनच्या माणकाप्रमाणे तपासणी करण्यात येते. अतिशय कठीण मानके असलेल्या कसोट्यांना हा विभाग सामोरे गेला . आता या विभागाने दर्जा व गुणवत्ता टिकवुन ठेवत तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन प्राप्त करून संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.