संजीवनी फार्मसी व सिनिअर कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची हेटेरो फार्मा कंपनीत नोकरीसाठी निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी बी.फार्मसी कॉलेज व संजीवनी आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (सिनिअर कॉलेज) च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने काही दिवसांपुर्वी हैदराबाद येथिल हेटेरो फार्मा या औषध निर्माण कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. त्यानुसार कंपनीच्या प्रतिनिधिंनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींचा निकाल कंपनीने नुकताच जाहिर केला असुन यात एकुण तीस विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केल्याचे अधिकृत पत्र दिले. यावरून संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सर्वच पदवी व पदवीका शिक्षण देणाऱ्या संस्था ग्रामीण विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यात आघाडीवर असल्याचे अधोरेखित होते, अशी माहिती दोनही महाविद्यालयांच्या वतीने संयुक्त पत्रकाद्वारे दिली आहे.
हेटेरो फार्मा या १४० पेक्षा अधिक देशात विस्तार असणाऱ्या कंपनीने बी. फार्मसी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील आकांक्षा कस्तुरे,यश बागुल,सारीका भोसले, निकिता दीहातोंडे, गौरव धावडे, ऋतुजा गायकवाड,प्रियंका गमे, प्रज्वल खंडागळे, मोहम्मद सरफराज अस्लम, कांचन नाईक, नितिन येवले, सोमनाथ गोसावी, श्रीजीत पांढवले, सिनिअर कॉलेजच्या ऋतुजा बनकर, सौरभ देवकर, सुमित देवकर, श्रुती देवकर, षंकर डोंगरे, संकेत गव्हाणे, वैभव माळी, प्राजक्ता तुरकणे, चंद्रकांत रहाणे, गणेश सालकडे, वैष्णवी शिंदे , प्रविण सिनगर, दर्शन तांबे, राघवेंद्र तिडके, राहुल कदम, अजिंक्य वाघ व सिध्दार्थ पवार यांची निवड केली आहे.अशा प्रकारे संजीवनीच्या सर्वंच संस्था नामांकित कंपन्यांच्या सपर्कात राहुन कंपन्याना काय ज्ञान अभिप्रेत आहे, ते आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात, त्यामुळे गामिण भागातील युवक युवतींच्या हाताला चांगला रोजगार मिळत आहे. यामुळे पालक वर्गात समाधानाचे वातावरण आहे.संजीवनीचे अध्यक्ष श नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.