संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आपल्या अवती भोवती असलेल्या ग्राहकांच्या गरजा ओळखा. नाविण्यपुर्ण कल्पनांचा शोध घ्या. स्वयं प्रेरीत व्हा. मेक इन इंडियाचा ध्यास घ्या, आणि देशाला पुढे नेण्यासाठी उद्योजक बना. भारतीय इंजिनिअर आव्हाने स्वीकारण्यास सक्षम असतात, म्हणुन नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला जालना येथिल यशस्वी उद्योजक सुनिल रायथाथा यांनी केले.
संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केल्याबध्दल त्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन रायथाथा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू, रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रलचे अध्यक्ष राकेश काले, चिफ फायनान्स आफिसर विरेश अग्रवाल, प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख व डीन उपस्थित होते. या समारंभास विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने हजर होते.प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून चालु शैक्षणिक वर्षात विद्यार्थी व संस्थेने वेगवेगळ्याा क्षेत्रात राज्य व देश पातळीवर गौरवाचे कोणते कीर्तिमान मिळविले हे सांगीतले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगती करीत असुन महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पालीटेक्निकच्या यादीत या पॉलीटेक्निकचा समावेश असल्याचे सांगीतले.

रायथाथा पुढे म्हणाले की जी संसाधने आपल्याकडे आहेत त्यांचा उत्तम उपयोग कसा करता येईल यावर मंथन केले पाहीजे. परमेश्वराने आपणास हात, पाय आणि बुध्दी दिलेली आहे, म्हणुन नाही म्हणायचेच नाही. उद्योग उभारणीसाठी पैसा लागतो, परंतु त्याहीपेक्षा आपल्या उद्योगासंदर्भातील नाविण्यपुर्ण कल्पना महत्वाच्या असतात. पैशापेक्षाही आपल्या कल्पना अधिक मौल्यवान असतात. उद्योगात पुढे जात असताना समस्या येतात परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर प्रगती खुंटते, म्हणुन समस्यांना आव्हान म्हणुन स्वीकारून त्यांच्यावर मात करा, आणि यशस्वी उद्योजक बना. प्रत्येक उद्योगात अपयश येतेच, परंतु खचुन न जाता पर्याय शोधत रहा. नायडू म्हणाले की संजीवनी संस्था ग्रामीण भागात असली तरी व्यवस्थापनाच्या दुरदृष्टीमुळे येथे वर्ल्ड क्लास शिक्षण मिळत आहे. यामुळे हमखास स्वावलंबी होणारी पिढी घडत आहेत.