पोलीस भरतीत एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे यश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच झालेल्या ‘मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत’ सहभागी होऊन एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले आहे. यामध्ये दीपक माधव आरणे व अजय हरिभाऊ पगारे यांना कॉन्स्टेबलपदी नियुक्ती झाली आहे. सदर विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी, “विद्यार्थ्यांनी याच पदावर न थांबता भविष्यात आणखी मोठे यश प्राप्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली”. या यशामध्ये महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा मोलाचा वाटा आहे, असे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथकाका शिंदे तसेच

महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ.माधव सरोदे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ. मोहन सांगळे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ.बाबासाहेब शेंडगे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे समन्वयक डॉ.निलेश मालपुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा.संजय गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले आहे.