Breaking
संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सात अभियंत्यांची जे.एस.कंट्रोल कंपनीत नेाकरीसाठी निवड

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

जशी इंजिनिअरींगच्या शेवटच्या सत्राची सुरूवात होते, तसा संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने पूर्व नियोजीत कंपन्यांशी केलेला संपर्क प्रत्यक्ष कृतित यायला सुरूवात होते. याचाच परीणाम म्हणुन अलिकडेच जे. एस. कंट्रोत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. या ड्राईव्ह अंतर्गत कंपनीने सात नवोदित अभियंत्यांची निवड करून संजीवनीचे अभियंते लागलीच नोकरीसाठी पात्र होत असल्याचे अधोरेखित केले, अशा प्रकारे एका पाठोपाठ एक कंपनीत संजीवनी आपल्या अभियंत्यांना नोकरी देवुन धडाकेबाज कामगिरी बजावत असल्यांची माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. जे.एस. कंट्रोल प्रा. लि. या विविध क्षेत्रातील कंपन्यांना उपकरणे पुरविणाऱ्या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या साई सुनिल राजुळे, अंजली ज्ञानेश्वर तणपुरे व सुधांशु मधुकर पाचोरे यांची निवड केली.याच कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या श्रुतिका प्रमोध गोरक्षा व संकेत दौलत रहाणे यांची निवड केली

जाहिरात
जाहिरात

तर मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या आदित्य प्रकाश वाणी व सुजित सुधाकर डुकरे यांची निवड केली. आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड झालेले सर्व नवोदित अभियंते व त्यांचे पालक यांनी समाधान व्यक्त करून आम्ही प्रवेशाच्या वेळी संजीवनीवर जो विश्वास टाकला होता, तो संजीवनीने सार्थ ठरवुन आमच्या पाल्यांना स्वावलंबी बनविले. पालकांसाठी आपली पाल्ये हीच जगातील मौल्यवान संपत्ती असते. आणि ते स्वावलंबी बनले आहे, यापेक्षा दुसरा आनंद नाही, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. प्रसाद पटारे, डॉ. राजेंद्र कापगते, डॉ. दिपेश परदेशी व डीन टी अँड पी डॉ. विशाल तिडके यांचेही अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »