समता

कोपरगावातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात ५४ वर्षानंतर ओसंडला भावनांचा महापूर

0 5 3 7 0 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या १९६८-६९ ते १९७१-७२ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव संजीव कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुधीर डागा, १९६८-६९ ते १९७१-७२ या बॅचचे शिक्षक सुधाकर गणोरकर, एन. एम. जोशी, अविनाश घैसास आदींच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

स्नेह मेळाव्यासाठी ५४ वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्याने एकमेकांना मिठ्या मारत होते. एकच हास्य कल्लोळ झाला होता. जुन्या आठवणी, प्रसंग जो तो सांगत होता. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रसंग ऐकून चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

१९६८-६९ ते १९७१-७२ या बॅचचे विद्यार्थी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या महाविद्यालयातील शिक्षकांनी शिकविलेल्या डेबिट क्रेडिट मुळे व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहन मिळाले. माजी विद्यार्थ्यांना नेहमी सहकार्य व पाठीशी उभे राहणारे हे महाविद्यालय आहे.अशोकराव रोहमारे यांनी के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पाया घातला. त्यांचे चिरंजीव संदीप रोहमारे यांनी अतिशय उत्तम प्रकारे त्यावर कळस चढविला आहे. अशोकराव रोहमारे यांचे मॅनेजमेंट उत्कृष्ट असून या महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे. माजी विद्यार्थ्यांच्या यशाची परंपरा या महाविद्यालयाला लाभली आहे.माजी विद्यार्थी नारायण क्षीरसागर, अश्विन कुमार व्यास, पद्मा कोटस्थाने, शिक्षक सुधाकर गणोरकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुधीर डागा आदींच्या मनोगतातून ५४ वर्षानंतर एकत्र आल्याने भावनांचा महापुर ओसंडत होता. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. तसेच समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुधीर डागा, आशुतोष पटवर्धन, शब्बीर पठाण, श्रीकांत बागुल, सुधीर गवांदे आदींनी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिकाधिक उंचविण्यासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य विजय ठाणगे यांच्याकडे आर्थिक स्वरूपात देणगी देण्यात आली. तसेच माजी विद्यार्थ्यांच्यावतीने महाविद्यालयाला एकत्रितरीत्या देणगी दिली गेली. महाविद्यालयाचे कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व विभागांची माहिती देत शैक्षणिक प्रगतीचा आलेख सादर केला असता माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
जाहिरात

प्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुधीर डागा म्हणाले की, विद्यार्थी हा शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थीच असतो. त्याचे शरीर थकत असते पण त्याचे मन कधीही थकू शकत नाही. त्याच्यात सतत काही ना काही शिकण्याची धडपड चालू असते. महाविद्यालयाच्या भव्य इमारती आणि त्या इमारतींमधून दिले जाणारे ज्ञान हे आमच्यासाठी आणि पुढील पिढीसाठी देखील अमृत आहे.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे म्हणाले की, या महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. सौ.सुहासिनी कोयटे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या भागात पाण्याची टाकी बांधून महाविद्यालयाला पाण्याची येणारी अडचण सोडविली होती. त्यामुळे कोयटे परिवाराच्या सेवाभावी सहकार्यामुळे अनेक प्रश्न सुटत आलेले आहे. तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देखील अनेक समस्या सोडविण्यात आल्या आहेत.या स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य विजय ठाणगे यांनी केले. स्नेह मेळावा यशस्वीतेसाठी या बॅचचे बाबासाहेब मांडवडे व नारायण क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले. दिलीप परदेशी, विजय देशपांडे, अशोक लोंगाणी आदींसह माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून ९० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी समता इंटरनॅशनल स्कूल मधील आस्वाद मेसमध्ये बनवत असलेल्या मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शैलेश बनसोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार कार्यालयीन अधीक्षक अभिजीत नाईकवाडे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे