महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल उद्या वाजण्याची शक्यता

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याबाबत राजकीय गोटामध्ये एकच चर्चा सुरू आहे मात्र महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आणि शासन निर्णयाद्वारे निर्णयांचा सपाटा लावला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दर मंगळवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सोमवारी घेऊन या बैठकीत 19 मोठे निर्णय घेण्यात आले तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांची 7 जणांच्या यादीवर शिक्का मोर्तब देखील घेण्यात आले त्यामुळे या चर्चेला अधिक उधान आले आहे त्यामुळे विधानसभेचा बिगुल उद्या वाजणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये ऐकायला मिळत आहे तसेच सध्या या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व मंत्री व आमदार महोदय आप आपल्या मतदारसंघांमध्ये रवाना झाल्याचे समजते त्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता सुरू होईल व 19 नोव्हेंबरला निवडणूक व 22 नोव्हेंबरला निकाल जाहीर होऊ शकतो असा एक अंदाज राजकीय वर्तुळामध्ये बांधला जात आहे विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया निकालासह 26 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण केली जाईल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी स्पष्ट केले होते त्या अनुषंगाने आचारसंहितेचा कालावधी 30 दिवसांचा असेल हे लक्षात घेता आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू केली जाण्याची शक्यता आहे कारण निकालानंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन 26 नोव्हेंबर पर्यंत घ्यावे लागणार आहे. अशी देखील चर्चा राजकीय गोटातून सुरू असल्याचे ऐकायला मिळते.