श्री गणेशाचे आगमन झाले त्याचबरोबर गौरीही आल्या मात्र कोपरगावात आनंदाचा शिधा अजून नाही आला

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना गणपती व गौरी सणाच्या निमित्ताने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते परंतु गणपती बाप्पा आले तसेच मंगळवारी गौरी सुद्धा आल्या मात्र तरीही कोपरगाव तालुक्यात लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही त्यामुळे गोर गरिबांनी सण कसा साजरा करायचा असा प्रश्न कोपरगाव शहरासह तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे खऱ्या अर्थाने राज्य शासनाने आनंदाचा शिध्यावर सहा वस्तू जाहीर केल्या होत्या मात्र त्यामधील चारच वस्तू लाभार्थ्यांना मिळणार आहेत त्यातच सध्या कोपरगाव येथील गोडाऊन मध्ये साखर व पामतेल सध्या प्राप्त झालेले असून अजून दोन वस्तूंची कमी असल्याने जिल्हा पुरवठा विभागाकडून त्या दोन वस्तूंची कोपरगावकरांना प्रतीक्षा आहे सध्या कोपरगाव शहरासह तालुक्यात 113 स्वस्त धान्य दुकानातून 6791 अंत्योदय कुटुंब कार्डधारक तसेच 37 हजार 277 प्राध्यान्य कुटुंब कार्डधारकांना हा आनंदाचा शिधा आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 पर्यंत प्राप्त झालेला नाही मात्र आज सकाळी साडे अकरा वाजे पर्यंत कोपरगाव गोडाऊन मध्ये साखर व पामतेल प्राप्त झाले आहे मात्र रवा व चणाडाळ येणे बाकी आहे तसेच रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर पामतेल असा ४ वस्तूंचा संच 100 रुपयात यापूर्वी देण्यात आला होता त्यानंतर राम जन्मभूमी सोहळा व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या शिध्यामध्ये मैदा व पोह्यांचा समावेश करण्यात आला होता मैदा व पोहे या २ वस्तूत वाढ करताना अन्य रवा व चणाडाळ या दोन वस्तूंचे वजन एक किलो वरून अर्धा किलो वर घटविण्यात आले मात्र आता पुन्हा ६ वस्तूंची संख्या चार वर येऊन ठेपली असून त्या चार वस्तू देखील शिधा धारकांना मिळाल्या नाही त्यामुळे सणा मागून सोहळे अशी म्हणण्याची वेळ शिधाधारकांवर येऊन ठेपली आहे तेव्हा गोरगरिबांनी हा सण उत्सव गोड कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.