संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनीचे विद्यार्थी रशियात बेस्ट प्रोजेक्ट अवार्डने सन्मानित

0 5 3 8 2 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (एसजीआय) संचलित विविध संस्थाचे १५ विद्यार्थी संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने वर्ल्ड रॅन्क ३३१ असलेल्या उरल फेडरल युनिव्हर्सिटी (उर्फु),रसिया येथे २० दिवसाच्या संशोधनात्मकआंतरवासीतेसाठी (रिसर्च इंटर्नशिप ) गेले होते. त्यांचा जाणे, येणे, राहणे व जेवण यासाठी उर्फु व रशिया सरकारने शिष्यवृत्ती दिली होती. १५ पैकी ६ विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट स्पर्धेत भाग घेवुन ‘एल लायझिन फ्रॉम दि ट्रक ऑफ फुड बायोटेक्नॉलाजी’ या विषयावर सादरीकरण देवुन बेस्ट प्रोजेक्ट अवार्ड जिंकले. त्यांना विद्यापीठाच्या प्रा.एलिना व इतर प्राद्यापकांनी सन्मानित केले आहे अशी माहिती संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे या प्रकल्प स्पर्धेत संजीवनी सिनिअर कॉलेजच्या एम.एस सी ऑरगॅनिक केमिस्ट्री विभागाच्या सुमित संजय देवकर, स्वप्निल प्रशांत ठोंबरे, वैभव मधुकर माळी, तेजल अनिल तांबे, पीजीडीएम विभागाचा दर्शन आन्नासाहेब चौधरी व एमबीए विभागाचा विशाल रमेश थोरात यांनी सहभाग नोंदवुन बेस्ट प्रोजेक्ट अवार्ड जिंकले.वरील सहा विद्याथ्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे शंकर आनंदा मानुरकर व संस्कृती संतोष गंभिरे, एमबीए विभागाचे जैद अर्फात शेख, अक्षदा युवराज शेवाळे, कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाची सुजाता सुभाष मंडाळे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या श्रुती लक्ष्मण खडांगळे व संस्कृती विनायक जावळे,संजीवनी सायन्स कॉलेजचे प्रफुल्ल संदिप निळे व पुजा भाऊ पाटील शेवकर यांचीही रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाली होती.एसजीआयचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने चालु वर्षी कॅनडा, तैवान, रशिया, युके, ट्युनिसिया,इत्यादी देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये ३४ पेक्षा अधिक विद्यार्थ्याची इंटरनॅशनल इंटर्नशिपसाठी निवड झाली होती.याच विभागाच्या प्रयत्नाने १० विद्यार्थी सध्या परदेशात एमएस करीत आहेत.परदेशातील अनेक नामवंत विद्यापीठांशी परस्पर समजोता करार संजीवनीने केलेले असल्यामुळे शैक्षणिक बाबतीत ग्रामिण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे व विद्यार्थीही संजीवनीने दिलेल्या संधीचे सोने करीत आहे,असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.तसेच एस जी आयचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विजेते विद्यार्थी व डीन-इंटरनॅशनल रिलेशन्स डीपार्टमेंट डॉ.महेंद्र गवळी यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे