महाराष्ट्र

विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने कोपरगावकंर हैराण

0 5 4 1 2 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

कोपरगाव शहरातील सर्वच प्रभागांमध्ये महावितरणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे कोपरगावकंर नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरासह सर्वच प्रभागांमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना विज बिल भरून देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच ऐन दुपारच्या वेळेत पाऊस नसल्याने हवामानात झालेला बदल लक्षात घेता वातावरणामध्ये उष्णतेचा उकाडा वाढल्याने त्यातच विद्युत पुरवठा खंडित झाल्या वर घरातील लहान लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने कोपरगावकरांना विज बिल भरून देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे अखेर बुधवार दिनांक ३ जुलै २०२४ रोजी सुभाषनगर येथील संतप्त नागरिकांचा संयम सुटला अन् त्यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन निषेध नोंदवला असता महावितरण कार्यालयात नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने निषेध नोंदवण्यासाठी गेलेल्या नागरिकांना खाली हात घरी परतावे लागले याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी दखल न घेता आपलेच काय ते खरं असे नेहमीचे ठरलेले वाक्य सांगून वेळ काढू पणा केला पण जर गुरुवार पासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयावर आंदोलनाचा इशारा या नागरिकांनी दिला आहे तसेच ग्राहकांच्या लाईट संदर्भात तक्रार निवारणासाठी महावितरणने वायरमन अथवा लाईनमन यांना मोबाईल दिलेले आहे मात्र ते मोबाईल ते उचलत नाहीत उचलले तर ग्राहकांच्या तक्रारी समजून घेत नाहीत घेण्याचा प्रयत्न केला तर मध्येच कट करून टाकतात अशा अनेक तक्रारी असून देखील महावितरणने ग्राहकांच्या जीवाशी खेळू नये असा संतप्त नागरिकांनी महावितरणला केला आहे अन्यथा कोपरगावकरांना आपल्या हक्काच्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अखेर आंदोलन करावे लागेल तशी वेळ महावितरणने येऊ देऊ नये हीच ती माफक अपेक्षा कोपरगावकरांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे