Breaking
महाराष्ट्र

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे,यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास, किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचारी व दलालांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत त्याचबरोबर या योजने संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे तसेच त्यानंतर योजनेचा फार्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रिये संदर्भात नुकतीच विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलद गतीने होईल यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत माता भगिनींचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय ही लगेचच काढण्यात आला या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे ही योजना म्हणजे माता भगिनींना माहेरचा आहेर आहे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही या दृष्टीने चोख नियोजन करावे लाडक्या बहिणीची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »