शिर्डी माहिती कार्यालय

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची काउंटडाऊन सुरू तिघांत रस्सीखेच

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणीला ३ दिवस शिल्लक राहिले असून त्या अनुषंगाने महायुती महाविकास आघाडी कि वंचित या उमेदवारांनी आपलाच विजय होणार असे दावे करून विजयी होण्याचे संकेत मतदारांना दिले आहे आज शनिवार दिनांक १ जून २०२४ सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली निवडणुकीच्या घोषणेनंतर देशात आचारसंहिता लागू झाली यानंतर भाजप नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांनी आप आपली निवडणूक रणनीती धारदार करण्यास सुरुवात केली सात टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने बेरोजगारी, महागाई, जात जनगणना, तसेच संविधान वाचवण्याचे प्रमुख मुद्दे प्रचारातून मतदारांसमोर आणले तर एनडीएने मोदी सरकारच्या १० वर्षातील विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला तसेच पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये प्रचार दौरे केले त्यातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार दौरा केला त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीची जागा प्रतिष्ठेची बनवल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक मंत्र्यांनी तळ ठोकला होता त्या अनुषंगाने १३ मे २०२४ रोजी मतदान झाल्यानंतर ४ जून २०२४ रोजी च्या निकालाची उत्सुकता राजकीय वर्तुळा सह मतदारांना लागली आहे यावेळी विविध राजकीय विश्लेषकांनी तसेच विविध पक्षांने निवडणुकी बाबत निवडणुकांचे मांडलेले गणित यंदा कोलमडणार आहे तर या मतदानाचे अवलोकन कसे करावे या विवंचनेत अनेक जणं आहेत कोणालाही ठामपणे आपलाच विजय होणार हे सांगणे देखील अवघड होऊन बसले आहे तसेच गाव खेड्यासह वाड्या वस्त्यांवर एकच विषय तो म्हणजे कोण निवडून येणार ! कोणी कोणाला सपोर्ट केला ! त्या उमेदवाराचा लेखाजोखा असे विषय रोज सकाळी सकाळी कट्ट्यावर सुरू असत महायुती महाविकास आघाडी व वंचित तसेच अपक्षांनी घेतलेली मते कुणाच्या पराभवाला कारणीभूत ठरणार हे येत्या ३ दिवसानंतर स्पष्ट होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे