मतदारांनो मताचा कौल देण्याचा दिवस उजाडला चला तर मग आपणही मतदानाचा हक्क बजावू या!

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज संपन्न होत असतांना शिर्डी लोकसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी आज सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी सकाळपासून मतदान केंद्रावर प्रशासन सज्ज झाले आहेत त्यातच दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे व ढगाळ हवामान असल्याने आज मतदानाच्या दिवशी सकाळी हवेत गारवा झाल्यामुळे सकाळी मतदान केंद्रावर बऱ्यापैकी गर्दी जाणवत होती तसेच आजच्या दिवसासाठी मागील एक महिन्यापासून शासनाचे अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियोजन करत होते तसेच मतदारांचा टक्का वाढावा यासाठी कोपरगाव नगरपरिषद व तहसीलदार यांच्यासह काही सेवाभावी संस्था गणेश मंडळे यांनी शनिवारी शहरातून जनजागृती फेरी काढली होती त्यासाठी रोख बक्षिसे व पारितोषिक देखील ठेवण्यात आले होते तसेच काही सेवाभावी संस्था व मंडळे यांनी घरोघरी जाऊन मतदान जनजागृती केली आज होत असलेल्या शिर्डी मतदार संघात एकूण २० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत तसेच सर्वच उमेदवार नी शहरापासून ते गाव खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून प्रचारात आघाडी घेतली आहे यामध्ये प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे तर शिवसेना पक्षाचे उमेदवार सदाशिव लोखंडे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासह १७ उमेदवार आज आपले नशीब आजमावत आहेत शिर्डी मतदारसंघात ८ लाख ६४ हजार ५७३ पुरुष मतदार असून ८ लाख १२ हजार ६८४ महिला मतदार असून ७८ तृतीयपंथी मतदार असे एकूण १६ लाख ७७ हजार ३३५ मतदार शिर्डी मतदार संघात आहेत

या मतदानासाठी १ हजार ७०८ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाची टीम सतर्क ठेवण्यात आली आहे या अगोदरच्या २०१९ च्या निवडणुकीत शिर्डी मतदार संघाची ६४.८६ % मतदान झाले होते तेव्हा यावेळेस मतदारांनी आपली जबाबदारी व कर्तव्य समजून आज होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला मताचा पवित्र हक्क बजवावा तसेच मतदारांनी मतदानाला जाताना मोबाईल सोबत घेऊन जाऊ नये तसेच मतदान करण्यासाठी जाताना सोबत मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र किंवा बँक/ पोस्ट कार्यालयाने जारी केलेले फोटो असलेले पासबुक तसेच मनरेगा जॉब कार्ड /महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्ड किंवा छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज यापैकी कुठलेही एक ओळखपत्र मतदानासाठी सोबत घेऊन जावे व आपले मतदानाचे कर्तव्य बजवावे तसेच आज होणाऱ्या २०२४ च्या मतदानची टक्केवारी कितीने वाढणार याकडे राजकीय विश्लेषकांना उत्सुकता लागून राहिली आहे.