85 वर्षांपुढिल जेष्ठ नागरिक व दिव्यांग अशे 700 मतदार घरात बसून बजावणार मतदानाचा हक्क

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक जे 85 वर्षा पुढील जेष्ठ नागरिक आहेत ते व दिव्यांग व्यक्तींचे अहमदनगर जिल्हा निवडणूक आयोगाने जो सर्वे केला होता त्यानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये 700 अर्ज दाखल झाले आहेत त्यानुसार जिल्हा निवडणूक आयोग त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन पोस्टल मतदान करून घेणार आहे यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी व दिव्यांगानी बी एल ओ कडे अर्ज केले आहेत सदर अर्ज हे 18 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 या कार्यकाळा मध्ये मतदारांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते

त्या अर्ज केलेल्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींचे 7 एप्रिल 2024 ते 9 एप्रिल 2024 या तीन दिवसांच्या कालावधीत अर्ज केलेल्या त्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी किंवा दिव्यांग व्यक्तीच्या घरी प्रत्यक्ष बूथ उभारले जाणार आहेत त्यासाठी दोन निवडणूक अधिकारी ,पोलीस तसेच सूक्ष्म निरीक्षक व कॅमेरामन अशी टीम हे काम बजावणार आहेत तसेच असक्षम असलेल्या मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली आहे.