शिर्डी माहिती कार्यालय
उमेदवारांनी वेळोवेळी खर्च सादर करावा लागेल

0
5
3
5
4
5
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे
नोडल अधिकारी (खर्च) सदाशिव पाटील यांनी निवडणूक खर्चाविषयी उमेदवारांना यावेळी मार्गदर्शन केले. शिर्डी लोकसभेची उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांची दैंनदिन नोंदवही संपूर्ण प्रचार कार्यकाळात किमान तीन वेळा खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.

शिर्डी लोकसभेतील उमेदवारांच्या खर्च लेख्यांची तपासणी ३ मे, ७ मे व ११ मे या तारखेला राहाता उप कोषगार अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे. या तारखांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांचे दैंनदिन खर्च नोंदवह्यासह उपस्थित राहावे. असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
0
5
3
5
4
5