आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

होम मिनिस्टर स्पर्धा महिलांच्या कलागुणांच्या सादरीकरणासाठी योग्य व्यासपीठ-आ.आशुतोष काळे

ब्राम्हणगावमध्ये रंगला होम मिनिस्टरचा खेळ

0 5 4 1 3 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव ‌

स्त्री हि फक्त कुटुंबाचा भार सांभाळण्यापुरतीच मर्यादित नाही आव्हानांना तोंड देणारी ती एक आद‌िशक्ती जननी आहे.आपल्या संस्कृतीत स्त्रियांना महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे नेहमीच महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असणाऱ्या प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या अंगी असलेल्या विविध कला-गुणांना वाव देण्यासाठी गणेशोत्सवा निमित्त होम मिनिस्टर-क्षण आनंदाचा खेळ उत्साहाचा हि स्पर्धा आयोजित केलेली आहे. महिलांच्या कला-
गुणांच्या सादरीकरणासाठी ‘होम मिनिस्टर’ योग्य व्यासपीठ असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले असून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य केले असून यापुढेही करीत राहणार असल्याची ग्वाही दिली आहे.कोपरगाव मतदार संघातील ब्राह्मणगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘होम मिनिस्टर-क्षण आनंदाचा, खेळ उत्साहाचा’ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ.आशुतोष काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे उपस्थित होत्या.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी महिला भगिनींशी संवाद साधला.या स्पर्धेसाठी ब्राह्मणगावसह येसगाव, नाटेगाव, टाकळी, रवंदे, सोनारी, मळेगाव थडी आदी गावांतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित महिलांनी सर्व स्पर्धेत सहभागी होत ह्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.या स्पर्धेतील विजेत्या महिला पुढीलप्रमाणे असून यामध्ये प्रथम बक्षीस सौ.पद्मा सोनवणे,द्वितीय बक्षीस सौ. उज्वला आहेर,तृतीय बक्षीस सौ. नेहा गंगावणे, चतुर्थ बक्षीस सौ. सोनाली देवकर, पाचवे बक्षीस सौ.स्वाती आहेर, सहावे बक्षीस सौ. वैशाली जाधव,सातवे बक्षीस सौ.वैशाली गाढे,आठवे बक्षीस सौ.शालिनी पोळ,नववे बक्षीस सौ. पूनम आहेर व दहावे बक्षीस सौ.पूनम मंडलिक यांना मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे