एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील सद्गुरू गंगागीर महाराज संस्थेच्या गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्ष कला वर्ग उद्बोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि कै. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमापूजनाने झाली.सदर उद्बोधन वर्गासाठी प्राचार्य डॉ. एम.टी.सरोदे यांनी अध्यक्षीय पद स्वीकारले.यावेळी अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ.एम.टी.सरोदे यांनी, “विद्यार्थ्यांना आशीर्वादपर उद्बोधन करत ध्येय आणि उद्दिष्टे ठरवून सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला. तसेच कॉलेजच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले.”या प्रसंगी विविध विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागांची व उपक्रमांची माहिती दिली; त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रा.डॉ.ए. बी.भागवत, विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती डॉ.रंजना वर्दे, विद्यार्थी विकास मंडळाविषयी प्रा.डॉ.एम.आर. यशवंत, परीक्षा विभागाविषयी प्रा.एस.डी.रणधीर,स्पर्धा परीक्षेविषयी प्रा.ए.पी.इंगळे, शॉर्ट टर्म कोर्सची माहिती प्रा. काकडे एस.एस.संशोधन विभागाविषयी प्रा.डॉ.व्ही. एल.गाढे,राष्ट्रीय सेवा योजने विषयी प्रा.डॉ.बी.ए.तऱ्हाळ,

सांस्कृतिक विभागाची माहिती प्रा.डॉ.एस.पी.पवार,तसेच आय.क्यू. ए. सी. विषयी विस्तृत माहिती प्रा. डॉ. एन. व्ही. मालपुरे, एन.सी.सी. विभाग प्रा. डॉ. एस. बी. चौधरी, ग्रंथालय प्रा. सी. टी. खैरनार, जिमखाना विभाग प्रा. डॉ. व्ही. एस. पवार, महिला अत्याचार प्रतिबंधक समितीच्या डॉ. उज्ज्वला भोर या सर्वांनी आपापल्या विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध सेवा आणि सुविधा समजावून सांगितल्या.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्राचार्यांचा परिचय प्रा. डॉ. एम. आर. यशवंत यांनी केले. सदर वर्गासाठी डॉ. बाळू वाघमोडे, डॉ. प्रमोद चव्हाण, प्रा.किरण पवार, डॉ. रावसाहेब दहे, प्रा.सुनील काकडे, प्रा.मनोज आवारे, प्रा. शसुकेशिनी दुशिंग, प्रा. आरती खामकर, प्रा. जकरिया शेख, प्रा.प्रदीप जगझाप यांसह कला शाखेतील नवीन प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सीमा दाभाडे यांनी केले तर आभार प्रा.टी.वाय.रणदिवे यांनी मानले.