आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कोळपेवाडीच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी महिला मंडळ आयोजित

0 5 4 0 1 0

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

गणेशोत्सवाचा महिलांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या वतीने कोपरगाव मतदार संघातील विविध गावात ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कोळपेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमासाठी महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे परंतु ग्रामीण भागातील महिला आजही संसार प्रपंचात व्यस्त असल्यामुळे त्यांना शहरातील महिलां प्रमाणे आपले कला, गुण व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नाही. हे व्यासपीठ आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या वतीने कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गप्पा गोष्टी, रंगतदार खेळ आणि या खेळातून हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांसाठी मिळत असल्यामुळे कोळपेवाडी येथे कोळपेवाडीसह माहेगाव देशमुख, कुंभारी, सुरेगाव, कोळगाव थडी, शहाजापूर, मढी बु. वेळापूर, धारणगाव, जेऊर पाटोदा, चांदगव्हाण, मुर्शतपुर, हिंगणी, डाऊच बु. आदी गावांतील महिलांनी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमा उत्स्फूर्त देवून स्पर्धेत सहभागी होत खेळाचा आनंद लुटला.यावेळी उपस्थित असलेले आ.आशुतोष व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा सौ.चैतालीताई काळे यांनी महिला भगिनींशी संवाद साधला त्यावेळी असंख्य महिलांनी कोपरगाव मतदार संघाच्या झालेल्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले.याप्रसंगी विविध स्पर्धेमध्ये उपस्थित महिलांनी सहभागी होत बक्षिसांची लयलूट केली. यातील ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतील विजेत्या महिला पुढीलप्रमाणे असून यामध्ये प्रथम बक्षीस सौ.दक्षिणा जोशी, द्वितीय बक्षीस सौ. प्रियंका बढे,तृतीय बक्षीस सौ.ज्योती देवकर, चतुर्थ बक्षीस सौ.पूजा भळगट, पाचवे बक्षीस सौ.अश्विनी कोळपे, सहावे बक्षीस सौ. कोमल वल्हे,सातवे बक्षीस सौ.सुनिता भोंगळ,आठवे बक्षीस सौ.कामिनी चौधरी नववे बक्षीस सौ.साक्षी घोंगते व दहावे बक्षीस सौ. ठकुबाई कवीश्वर यांना मिळाले.स्पर्धेतील महिला विजेत्यांना आ.आशुतोष व सौ.चैतालीताई काळे यांच्या बक्षीस वितरण करण्यात आले. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांनी गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी राबविलेल्या ‘होम मिनिस्टर’ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे महिलांनी भरभरून कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे