एस.एस.जी.एम. महाविद्यालयात रसायन शास्त्रविभाग आयोजित राष्ट्रीय परिषद संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि रसायनशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने भौतिक विज्ञान आणि हरित रसायनशास्त्रातील सध्याची प्रगती या महत्त्वपूर्ण विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले. या परिषदेमध्ये भौतिक विज्ञानातील सध्याची प्रगती आणि हरित रसायनशास्त्र पृथ्वीवरील जीवन कसे टिकवून ठेवू शकते यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांनी परिषदेमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व बळवंत महाविद्यालय विटा सांगली चे प्राचार्य माननीय डॉ.विठ्ठलराव शिवणकर यांच्या शुभहस्ते झाले. सदर प्रसंगी त्यांनी ‘त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करणाऱ्या नॅनो पदार्थांबद्दल भाष्य केले’.ते म्हणाले , “स्मार्ट मटेरियल, नॅनो मटेरियल, कंपोस्ट सामग्री, सोपिस्टिक सामग्री यांच्या वापराने दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. भौतिकी रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकीमधील संशोधकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विशिष्ट अवयवांना लक्ष्य करणारी औषधे तयार केली जी विशिष्ट कर्करोगावर प्रभावी आहेत.” उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.टी. सरोदे साहेब यांनी, “ए.आय.तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय परिषद घेण्याचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले,“पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी हरित रसायनशास्त्र उपयुक्त आहे” या साठी रसायनशास्त्राच्या क्षेत्रात अधिक क्रांती होणे आवश्यक आहे.”असे प्रतिपादित केले. परिषदेत ‘भौतिक विज्ञानातील सध्याची प्रगती आणि हरित रसायनशास्त्र पृथ्वीवरील जीवन कसे टिकवून ठेवू शकते.’

यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेत जवाहर लाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठ, हैदराबाद येथील एमेरिटस प्रोफेसर डॉ.डी. अशोक यांनी, स्वच्छ पर्यावरणासाठी हरित रसायनशास्त्राबद्दल प्रेक्षकांना मार्गदर्शन केले, आय.आय.टी. इंदोर येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. उमेश ए. क्षीरसागर यांनी, “रसायन संश्लेषणातील विविध मार्ग, फोटो केमिस्ट्री आणि दृश्यमान मध्यस्थीच्या फायद्यांबद्दल मार्गदर्शन केले”.जैन विद्यापीठ बंगळुरू येथील असोसिएट प्रोफेसर डॉ.रमेश बी. दातीर यांनी, “शाश्वत सेंद्रिय परिवर्तनासाठी नॅनो कॅटालिसिसवर अधिक भर दिला”.परिषदेचे प्रास्ताविक विज्ञान विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. मोहनराव सांगळे यांनी केले. सदर परिषदेसाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. अरुण देशमुख, डॉ. नामदेव चव्हाण,डॉ. प्रतिभा रांधवणे, संजय गायकवाड, डॉ. विलास गाडे, यांसह विभागातील प्राध्यापक आणि विज्ञान विद्याशाखेचे इतर प्राध्यापक यांनी परिषद यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम घेतले . सदर परिषदेसाठी , डॉ.बाबासाहेब शेंडगे, डॉ.अर्जुन भागवत, IQAC प्रमुख डॉ. निलेश मालपुरे, डॉ. रंजना वर्दे, डॉ. सिमा चव्हाण डॉ. संदीप वर्पे, प्रा. मनोज आवारे उपस्थित होते. आभार प्रा. गायकवाड एस.एस. आणि श्रीमती प्रियांका पवार यांनी मानले. या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. माधव यशवंत आणि डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. चर्चासत्रामध्ये ४५० अभ्यासकांनी सहभाग नोंदवला.