आ.आशुतोष काळेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत केला उमेदवारी अर्ज दाखल

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
शुक्रवार (दि.२५) रोजी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा कडून (अजितदादा पवार गट) आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आ.आशुतोष काळे यांची उमेदवारी निवडणूकीच्या अगोदरच जाहीर करण्यात आली असल्यामुळे पहिल्याच यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा कडून (अजितदादा पवार गट) त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, तसेच माजी आमदार अशोकराव काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, महानंदाचे माजी चेअरमन राजेश परजणे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राजेंद्र जाधव, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, मा.नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, पद्माकांत कुदळे, कारभारी आगवण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद, विजय त्रिभुवन आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अहिंसा स्तंभापासून गुरुद्वारा रोडवरून तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आ.आशुतोष काळे यांनी पुष्पहार करून अभिवादन केले.या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी अहिंसा स्तंभापासून ते तहसील कार्यालयापर्यंत आ. आशुतोष काळे व अभिनेते सयाजी शिंदे यांना खाद्यावर घेतले. आपला आशुतोष, माणूस कामाचा-माणूस हक्काचा, निर्धार विकासाचा-संकल्प विकासाचा अशा आशयाचे कार्यकर्त्यांनी हाता घेतलेले बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी रॅली सुरु असतांना ठिकठिकाणी सुवासिनींनी आ. आशुतोष काळे यांचे औक्षण केले.याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, निवडणूकीत विरोधी पक्ष असणारच आहे त्याबाबत माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे.
आ.आशुतोष काळेंचा विजय निश्चित
आ.आशुतोष काळे यांनी पाच वर्षात मोठी विकास कामे केली आहेत. त्यांच्यावर जनतेचे किती प्रेम आहे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. त्यांचे नाव आशुतोष असून या नावातच आशीर्वाद आणि आनंद आहे. २०१९ विजय मिळालाच आहे व २०२४ ला देखील मिळणार आहे त्यामुळे मला हि विजयी सभा असल्याचे जाणवत आहे. त्यांच्या कामाची पद्धत अतिशय चांगली असून जनतेचे त्यांना आशीर्वाद आहे व महायुती त्यांच्या सोबत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आ.आशुतोष काळेंचा विजय निश्चित आहे-अभिनेते सयाजी शिंदे
२०१९ ला निवडून दिल्यांनतर सातत्याने काम करून विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या असून मतदार संघातील नागरीक समाधानी आहेत. होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय होणारच आहे परंतु निवडणूक हि निवडणुकी प्रमाणेच होईल त्याप्रमाणे कुणालाही कमी न लेखता कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जास्तीत जास्त मतदान घडवून आणून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले.आ.आशुतोष काळे यांचे त्यांच्या पत्नी सौ.चैतालीताई काळे यांनी औक्षण केले यावेळी मा.आ.अशोकराव काळे व सौ.पुष्पाताई काळे यांचे आ. आशुतोष काळे यांनी आशीर्वाद घेतले.तसेच पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणातील कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आ.आशुतोष काळे यांनी पुष्पांजली अर्पण करून आशीर्वाद घेतले.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून रॅली निघाल्यानंतर उन्हाचे चटके जाणवत असतांना देखील आपल्या नेत्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अहिंसा स्तंभ ते तहसील कार्यालया पर्यंतचा रस्ता कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.रॅलीमध्ये लाडक्या बहिणीची संख्या देखील लक्षणीय होती. जिल्हा बँकेच्या मा.संचालिका सौ.चैतालीताई काळे या देखील महिलांसमवेत रॅलीमध्ये सहभागी होवून नागरिकांना हात जोडून अभिवादन करीत होत्या.