कोपरगाव शहर पोलीस स्टेशन
112 नंबर डायल केला आणि 6 मिनिटात फायर ब्रिगेड व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले

0
5
4
0
0
4
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील तालुका पोलीस स्टेशन मध्ये आज बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी डायल 112 या एमडीटी प्रणालीवर कॉल आला की सेवानिकेतन स्कूल सदर घटना ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे या टेली कॉलर ने अर्धवट कॉल करून पोलीस मदत हवी आहे असा कॉल केल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सरकारी वाहनाने अवघ्या 6 मिनिटात घटनास्थळी पोहोचले सदर ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मधील स्टाफ व फायर ब्रिगेडचा स्टाफ उपस्थित होता सदर घटनास्थळी डॉक्टरांनी सांगितल्यावरून सदरचा कॉल हा डेमो कॉल असल्याची खात्री झाली आहे सदर कॉल वरून फायर ब्रिगेड व पोलीस मदत अवघ्या सहा मिनिटात घटनास्थळी पोहोचले.

0
5
4
0
0
4