आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कोपरगाव मतदार संघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या निवडणूक यंत्रांना सज्ज

0 5 4 1 8 7

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव मतदार संघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या निवडणूक यंत्रांना सज्जकोपरगाव तालुक्यात २२ ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्व राजकीय नेते व पक्षातील निवडणुकीच्या घडामोडीला प्रारंभ झाला हळूहळू निवडणूक यंत्रणेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडीला सुरुवात झाली गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ रोजी रणधुमाळी शांत झाली या प्रचारादरम्यान कोपरगाव मतदार संघात राज्यस्तरीय शरदचंद्रजी पवार तसेच खासदार भाऊसाहेब वाकचौरे व राज्य पातळीवरील अजित दादा पवार बाळासाहेब थोरात तसेच जिल्हास्तरावरील नेत्यांनी आपापल्या पद्धतीने उमेदवारांच्या प्रचारासाठी गाव खेडे पिंजून काढले या रणधूमाळीत प्रचार सभेमधील आरोप प्रत्यारोपाची भाषणे मतदारांची चांगलीच करमणूक ठरली त्यानंतर आज मंगळवारी सर्वत्र छुपा प्रचार सुरू आहे या विधानसभेच्या रिंगणात १२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे ही निवडणूक दुरंगी होणार आहे या निवडणुकीत कोण कोणाच्या विजयाला व पराभवाला कारणीभूत ठरणार हे शनिवारी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे कोपरगाव मतदारसंघात २ लाख ८८ हजार ४११ इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदार १ लाख ४६ हजार ३३७ तर १ लाख ४३ हजार ३१३ महिला मतदार तसेच ६ तृतीयपंथी मतदार आहेत त्या अनुषंगाने २७२ मतदान केंद्र मतदानासाठी असणार आहे तेव्हा किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार यावर कोपरगाव मतदार संघाच्या उमेदवाराचे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक विभाग स्वीप समितीच्या वतीने गाव पातळीवर अनेक गावांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार जनजागृती मोहीम शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गावांमध्ये प्रभात फेरी काढून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोपरगाव मतदारसंघात सुरुवातीला वाटणारी एकांगी निवडणूक पुढे पुढे रंगत गेली या निवडणुकीच्या अनुषंगाने ९२८ मतदारांनी टपाली मतदानाचा लाभ घेतला आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून त्यासाठी २७ बस २१ मिनी बस व ०७ क्रुझर व इतर काही सरकारी वाहने आहेत या मतदारसंघात ०६ आदर्श म्हणजेच पिंक मतदान केंद्र करण्यात आले आहे त्यात युवक युवती महिला दिव्यांगांचे प्रत्येकी एक वेगवेगळ्या थीम घेऊन तीन केंद्रांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे उद्या होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ०७.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या १२ पुराव्यां पैकी कुठलेही १ पुरावा मतदारांनी सोबत घेऊन जावा

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे