संवत्सर जनता इंग्लिश स्कूलमध्ये प्रेरणादिन उत्साहात साजरा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संवत्सर येथे जनता इंग्लिश स्कूल मध्ये माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे उपस्थित होते.प्रेरणा दिनाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी एकत्रित येत शाळेमध्ये ०३ सोलरचे हायमॅक्स व एक मोठे इन्व्हर्टर आणि बॅटरी देण्यात आली. यासह संवत्सर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नऊचारी , लक्ष्मणवाडी, परजणे वस्ती, दसरथवाडी, बिरोबा चौक, वाघीनाला येथील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये एक डिजिटल वॉच, फॅन व सतरंज्या यांचे वाटप बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रा.पंडित भारुड यांनी लिहिलेला कोल्हे साहेबांच्या जीवनपटावर आधारित पोवाडा सर्वांना दाखवण्यात आला.याप्रसंगी बोलताना बिपीनदादा कोल्हे म्हणाले स्व.शंकरराव कोल्हे साहेबांच्या जयंतीला प्रेरणादिन म्हणून सर्वांनी साजरा करणे ही अभिमानास्पद बाब आहे.शिक्षण,रोजगार,सहकार,उद्योग व्यापार यांना उज्वल भविष्य येण्यासाठी साहेबांनी मोठे काम केले. शिक्षण घेतांना आपले ध्येय आणि लक्ष अर्जुनाप्रमाणे निश्चित असावे.स्पर्धेच्या युगात शिक्षण घेतले नाही तर भविष्य अंधारात जाते.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यानंतर स्व.कोल्हे साहेब आणि स्व.काळे साहेब यांनी शिक्षणाचे जाळे पसरविले. स्व.कोल्हे साहेबांची जयंती प्रेरणादिवस म्हणून साजरी करताना कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस अविस्मरणीय बनविला आहे.विविध क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाची जयंती उत्साहात साजरी होत आहे असे शेवटी म्हणाले.या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री शिवाजीराव बारहाते, बापूसाहेब बारहाते,

ज्ञानेश्वर परजणे, पांडुरंग शास्त्री शिंदे,बाळासाहेब शेटे, फकीरराव बोरनारे,त्र्यंबकराव परजणे,संजीवनी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन राजेंद्र परजणे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, रामभाऊ कासार,संभाजीराव बोरनारे, मुकुंदमामा काळे, विजय काळे, गणेश साबळे, किशोर परजणे, बापूसाहेब परजणे, गोविंद परजणे, अशोक लोहकने, अनिल भाकरे, प्रवीण भोसले, अशोक थोरात सर, योगेश परजणे,दिनकर बोरनारे,संदीप मैंद, प्रकाश बारहाते, सचिन शेटे, अनिल शेटे,शिवाजी शेटे, चिमाजी दैने,रवींद्रतिर मखे,किरण निरगुडे तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व को.सा.का चे संचालक दिलीप बोरणारे आदि मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण शिवाजीराव बारहाते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश परजणे यांनी केले तर पंडित भारुड यांनी आभार मानले.जनता इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रमेश मोरे सर,सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.