विविध उपक्रमांनी गणेश परिसरात प्रेरणादिन साजरा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
श्री गणेश सहकारी साखर कारखाना व गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. कोल्हे यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली असून विविध उपक्रम घेण्यात आले होते.प्रतिमापूजन,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि स्व.कोल्हे साहेब यांचे कार्य माहिती होण्यासाठी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी बोलताना चेअरमन सुधीर लहारे म्हणाले श्री गणेश परिसराला ऊर्जा देण्याचे काम स्व. कोल्हे साहेब यांनी केले.गणेश कारखाना अडचणीतून पुढे नेला आणि ऊसाच्या खोडक्या होण्यापासून वाचवल्या.दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहून गणेश बंधाऱ्यांच्या माध्यमांतून जलक्रांती घडविली.

ऊस उत्पादक आणि साखर कामगार यांच्यात कधी राजकारण न येऊ देता या परिसराला ऊर्जा दिली असे प्रतिपदान केले.ॲड.नारायणराव कार्ले म्हणाले कोल्हे साहेब यांना परदेशात संधी होत्या पण त्यांनी मायभूमीची सेवा केली.देशातील सर्वोत्तम कारखाना यादीत असणारा संजीवनी कारखाना उभारला.गणेश कारखान्याची घडी बसवली.अतिशय धार्मिक आवड असणारा त्यांचा स्वभाव होता.तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीवर अभ्यास यांचा होता.आमच्या कुटुंबाला त्यांच्या सोबत गणेशच्या निमित्ताने काम करता आले त्यावेळी वेगळे समाधान मला वाटले असे कार्ले शेवटी म्हणाले.या प्रसंगी कारखान्याचे व्हा चेअरमन विजयराव दंडवते, ॲड.नारायणराव कार्ले,भगवानराव टिळेकर,अनिल गाढवे,संपतराव हिंगे,बाळासाहेब चोळके,महेंद्रभाऊ गोर्डे,नानासाहेब नळे,आलेश कापसे,विष्णुपंत शेळके, गंगाधर डांगे,मधुकर सातव,भोसले साहेब आदीसह मान्यवर, सर्व संचालक मंडळ, आणि कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.