ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर केल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे आभार – रवींद्र आगवण

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ग्रामपंचायत इमारती व नागरी सुविधा केंद्रांच्या उभारणीसाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सुमारे २ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील चासनळी, शिंगणापूर, करंजी, दहेगाव बोलका, जेऊर पाटोदा, धोत्रे, धारणगाव, मुर्शतपूर या गावांचा समावेश असून प्रत्येकी २५ लक्ष रुपयांपर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे

याबद्दल करंजी गावचे सरपंच रवींद्र आगवण यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून या प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतला मदत करणाऱ्या मा. आ. स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनाही धन्यवाद दिले आहेत.ही योजना केंद्र शासनाची असून यामध्ये ६० टक्के निधी केंद्र शासन देते तर ४० टक्के निधी राज्य शासनाकडून दिला जातो. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील प्रशासनाच्या गुणवत्ता व कार्यक्षमता वाढवणे, तसेच ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाची नव्याने उभारणी अथवा सुधारणा केली जाते.यासाठी मंजूर झालेला निधी हा नियमित प्रशासकीय प्रक्रियेअंतर्गत व योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार संबंधित ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येतो. या निधीच्या मंजुरीसाठी कोणत्याही प्रकारचे आमदारांचे राजकीय हस्तक्षेप किंवा त्यांचा थेट संबंध नाही. संबंधित ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी मागणी केल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि शासनाच्या निकषांची पूर्तता झाल्यानंतरच हा निधी मंजूर केला जातो.त्यासाठी ग्रामपंचायतने केलेल्या मागणी व पाठपुराव्याचा आधार घेतला जातो.

हा निधी ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी उपयोगी ठरणार असून, ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा व प्रशासकीय सोयींसाठी सकारात्मक पाऊल ठरणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाचे यासाठी मन:पूर्वक आभार, कारण त्यांनी वेळेवर निधी उपलब्ध करून ग्रामीण विकासाची दिशा अधिक बळकट केली आहे असे शेवटी आगवण म्हणाले.