कोपरगाव शहरात मुक्या जनावरांचा आक्रोश – भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील बेवारस जनावरांसाठी नगरपालिकेने तयार केलेल्या कोंडवाड्यात जनावरे आणून डांबली जातात मात्र त्यांची योग्य प्रकारे देखभाल होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. चारापाणी, स्वच्छता याची कोणतीही नीट व्यवस्था नसल्याने दरम्यानच्या काळात तीन ते चार कालवडी मृत्यूमुखी पडल्या असल्याचे समजते. मुक्या जनावरांचा हा आक्रोश ऐकूनही नगरपालिका प्रशासन व आमदार काळे गप्प असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
जिवंत माणसांना रोजच रस्त्याने प्रवास करताना मरण यातना सहन कराव्या लागतात, त्यांचा तळतळाट लोकप्रतिनिधी घेत आहेत अगदी तसेच मुक्या जनावरांचा देखील तळतळाट घेण्याचे पातक आमदार काळे आणि पालिका प्रशासन करत असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
मोकाट जनावरांचा योग्य बंदोबस्त करून त्यांची दुसरीकडे व्यवस्था करण्यात आमदार काळे आणि नगरपालिका प्रशासन सपशेल फोल ठरले असून त्यांच्या नाकारत्या धोरणाचा भारतीय जनता पार्टी कोपरगाव शहर पदाधिकाऱ्यांनी जनावरांना चारा वाटप करून कडाडून निषेध व्यक्त केला आहे.भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव म्हणाले की, हजारो कोटींच्या विकासाच्या वल्गना होत असताना प्रत्यक्षात शहरात निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. रस्त्यांवर अनेक खड्डे पडलेले आहे.याशिवाय ही बेवारस जनावरे रस्त्यावर वावरताना अनेक नागरिक जखमी होतात.

खड्डे हुकवावे की जनावरे हा प्रश्न पडतो.पालिकेने पकडून डांबलेल्या जनावरांचा निदान करुन अंत होणार नाही याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.त्यांचा तळतळाट ऐकण्याऐवजी प्रशासन व आमदार काळे याकडे डोळेझाक करत आहेत. माणुसकी म्हणून या मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी तातडीने चारापाणी उपलब्ध करून दिले जावे आणि जबाबदारांवर कारवाई केली जावी.या पार्श्वभूमीवर भाजपाकडून कोंडवाड्यात असणाऱ्या जनावरांना स्वतः चारा वाटप करून व्यवस्थेचा निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास जनावरांच्या जीवितहानीसाठी थेट आमदार व नगरपालिका जबाबदार असतील असा इशारा वैभव आढाव यांनी दिला .

यावेळी भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव,हुसेन सय्यद, देविदास रोठे,रवींद्र रोहमारे,हर्षल जोशी,समाधान आढाव, कैलास नागरे, रवीअण्णा पाठक, निलेश बोराडे, अमोल पवार, राहुल रिळ,रहीम शेख, संतोष साबळे,श्याम आहेर,शुभम सोनवणे, प्रदीप निकुंभ, रोहित आढाव, जगदीश मोरे, साई नरोडे,अजय शार्दुल, प्रीतम आहेर आदींसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.