संजीवनीचा बाॅस्केट बाॅल संघ तालुक्यात अव्वल असण्याची परंपरा कायम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या बास्केटबॉल संघाने तालुका पातळीवरील क्रिडा स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली. विजेत्या संघाने अंतिम सामन्यात समता इंटरनॅशनल स्कूल संघाला आठ विरूध्द चार गुणांनी मात देत हे विजेतेपद पटकावले.
संजीवनी ज्युनिअर काॅलेज परिसरात विविध खेळांची विस्तीर्ण मैदाने आणि अनुभवी क्रिडा प्रशिक्षक उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना खेळात करिअर करायचे आहे. त्यासाठी सुसज्ज पायाभुत सुविधा आणि क्रिडा साहित्य देखील उपलब्ध आहे.-प्राचार्या अनुश्रिता सिंह
क्रीडा व युवक संचालनालय, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तालुका क्रीडा समितीच्या वतीने ही स्पर्धा कोपरगांव येथे आयोजीत करण्यात आली होती. संजीवनीचा बॉस्केटबॉल संघ मागील वर्षी विजेता असल्यामुळे पहिल्या सामन्यात पुढे चाल मिळाली. उपांत्य सामन्यात या संघाने शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघावर १५ विरूध्द ३ असा दणदणीत विजय मिळवीत अंतिम फेरीत धडक मारली.

अंतीम सामन्यात समता इंटरनॅशनल स्कूल संघाचा आठ विरूध चार अशा गुणांनी एकतर्फी विजय संपादन केला.विजेत्या संघातील खेळाडू नुतन अमित लाहोटी, तनिष्का चारूदत्त वलटे, श्रेया प्रसाद अय्यर, राजनंदिनी हरीचंद्र कोते, आलिया गुलामोद्दीन शेख , पल्लवी कृष्णा मेरगुवार व तनिशा राव यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आता हा संघ येत्या ८ आक्टोबर रोजी प्रवरानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कोपरगांव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या उपस्थितीत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते विजेत्या संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या अनुश्रिता सिंह, उपप्राचार्य एम. के. सोनवणे, जिमखाना विभाग प्रमुख नानासाहेब लोंढे, कोच स्तत्यम कोथलकर, सागर निकम, अक्षय येवले, आदी उपस्थित होते.