गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये संस्थेच्या सचिव चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भारती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.

रोजच्या जीवनातील प्रत्येक सोयी-सुविधा यामध्ये रस्ते,पूल,वीज,पाणीपुरवठा, यंत्रसामग्री,इंटरनेट सेवा यांचा पाया अभियंतेच घालतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीत त्यांचा देखील मोठा वाटा आहे. गौतम पॉलीटेक्निकमध्ये वर्षभर नेहमीच असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर दिला जातो. त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नव्या संकल्पना रुजवण्याची आणि त्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संस्थेचे शैक्षणिक निरीक्षक प्रा.नारायण बारे कार्यालय अधीक्षक अण्णासाहेब बढे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु.रोशनी वाणी व कु.दिपाली मोरे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.सादिक शेख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, तसेच प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.