केन हार्वेस्टद्वारे ऊस तोडणी करणे काळाची गरज -आ. आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
गेल्या काही वर्षांपासून ऊस तोडणी मजुरांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. पारंपरिक पद्धतीने ऊस तोडणारे मजूर आता इतर रोजगाराकडे वळत आहेत किंवा त्यांना ऊस तोडणी करायची इच्छा नाही. त्यामुळे गळीत हंगामात ऊस तोडणी मजूरांच्या टंचाईमुळे साखर कारखान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून सर्वच साखर कारखान्यांना ऊस तोडणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. ऊस तोडणी मजुरांची कमी होत चाललेली संख्या ही साखर उद्योगासाठी मोठी आव्हानात्मक बाब बनली आहे. यावर पर्याय म्हणून केन हार्वेस्टिंग यंत्रांचा वापर करून कामकाज अधिक प्रभावी करता येऊ शकते. ही केवळ सुविधा नसून ऊस उत्पादन क्षेत्राला भविष्यकाळात सक्षम ठेवणारी महत्त्वाची पायरी आहे. त्यासाठी केन हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करणे हि काळाची गरज झाली असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगरची ५४ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे मार्गदर्शक व चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली याप्रसंगी ते बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर शंकररावजी काळे व सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ करण्यात आला. अध्यक्ष पदाची सूचना चंद्रशेखर कडवे यांनी मांडली.

सदर सूचनेस रवींद्र आहेर यांनी अनुमोदन दिले. संचालक आप्पासाहेब निकम यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, मागील वर्षीचा गळीत हंगाम टंचाईचा होता. त्यामुळे सर्व प्रकारचा खर्च वाढला व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक धारकांचा व्यवसाय देखील कमी झाला.ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न मोठा अवघड झाला आहे त्यामुळे स्वत:ची ऊस तोडणी मजुरांची टोळी असणे गरजेचे आहे. मात्र ऊस तोडणी मजुर मिळत नसल्यामुळे भविष्यात केन हार्वेस्टिंग शिवाय दुसरा पर्याय नाही.एका साखर हंगामात लाखो टन ऊस तोडायचा असतो. मजुरांची संख्या कमी असल्याने कारखान्यांना वेळेत उस गाळप करता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि कारखान्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होवून कारखान्याचे देखील नुकसान होते. केन हार्वेस्टरची किंमत जास्त आहे ते खरेदी करणे एक-दोघांचे काम नाही त्यासाठी चार-पाच ट्रक धारकांनी मिळून केन हार्वेस्टर घ्यावे त्यामुळे ऊस तोडणी मजुरांच्या भरवशावर राहावे लागणार नाही.आपल्या कारखान्याची गाळप क्षमता काही प्रमाणात वाढणार आहे.गळीत हंगामाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कारखान्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे त्या दृष्टीने सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक धारकांनी सज्ज रहावे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक धारकांना कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी ज्याप्रमाणे सोयी सुविधा दिल्या त्या सुविधा यापुढील काळातही दिल्या जातील व तुमच्या अडचणी सोडविल्या जातील अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अहवाल वाचन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी केले तर आभार संचालक विजय जाधव यांनी मानले.यावेळी सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. यावेळी गौतम केन ट्रान्सपोर्टचे ज्येष्ठ संचालक छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, संचालक राजेंद्र घुमरे,वसंतराव आभाळे, सचिन चांदगुडे,अनिल कदम, दिलीपराव बोरनारे, श्रीराम राजेभोसले,मनोज जगझाप, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सुधाकर रोहोम,सुनील मांजरे, प्रशांत घुले,अशोक मवाळ, शंकरराव चव्हाण, सूर्यभान कोळपे,दिनार कुदळे,राहुल रोहमारे,गंगाधर औताडे,श्रावण आसने, सुरेश जाधव, विष्णू शिंदे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केन ट्रान्सपोर्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी, गोदावरी खोरे संचालक दिलीपराव शिंदे, विजयराव जाधव, विक्रम मांढरे, प्रदीप कुऱ्हाडे, कैलास आहेर, अशोक निळकंठ, रमेश कोळपे, विजय थोरात, विक्रम सिनगर, गौतम केनचे संचालक भिकाजी सोनवणे, अरुण घुमरे, बबनराव भारसाकळ, रामदास कोळपे, भाऊसाहेब जोरे, माणिकराव चंद्रे, गणेश आहेर, आप्पासाहेब निकम कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.