महाराष्ट्र

गरजू व गरीब बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांनी सह्य द्याव्यात

0 5 4 0 1 4

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील गोरगरीब नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ज्या त्या गावातील ग्रामसेवकांनी त्या बांधकाम कामगारांना सह्या व दाखले देऊन नूतनीकरण कामी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटना कोपरगाव यांनी केले आहे याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटना यांनी म्हटले आहे की शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना शासनाने सुरू केलेल्या असून मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्डची नूतनीकरण करणे बंधनकारक असते त्या कामी ग्रामविकास अधिकाऱ्यांची सही शिक्क्यानिशी दाखल्याची अत्यंत आवश्यकता असते मात्र ते दाखले सध्या ग्रामपंचायत पातळीवर दिले जात नाही या योजनेत अधिकृत व नोंदणीकृत असलेल्या संघटनेच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही संघटने कडून गोरगरीब बांधकाम कामगार मजुरांनी आपले महत्त्वाचे कागदपत्र त्यांच्याकडे देऊन फसवणूक करून घेऊ नये यासाठी नोंदणीकृत असलेल्या संघटनेकडे आपण आपली रीतसर नोंदणी करून त्याची पावती घ्यावी जे गरजवंत बांधकाम मजूर आहेत ते यापासून वंचित राहत आहे त्यामुळे कामगारांनी नोंदणीकृत संघटनेशी संपर्क करून आपले कागदपत्र देऊन याबाबत रीतसर पावती घ्यावी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही तसेच शासनाने अशा अनेक योजना काढल्या असून मात्र त्यासाठी त्या संबंधित अधिकाऱ्यांना या योजने संदर्भात अधिकार दिलेले नाहीत असे काही ग्रामसेवकांचे म्हणणे आहे.त्यामुळे नेमकी बांधकाम कामगारांची नेमकी व्याख्या शासनाने स्पष्ट केली नसल्याचे कारण दाखवून सदर कामगारांना दाखले मिळत नाहीत त्यामुळे गोरगरीब बांधकाम मजूर या योजनांपासून वंचित राहत आहे त्यामुळे जे प्रत्यक्ष काम करतात त्यांची खातर जमा करून त्यांना विना विलंब दाखले देण्यात यावे असे आवाहन कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटना कोपरगाव यांनी कोपरगावचे तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना केले आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे