आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

आ.आशुतोष काळे बुधवार पासून करणार प्रचाराचा शुभारंभ

0 5 4 1 3 3

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघांतील महायुतीचे अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवार दि.६ नोव्हेंबर २०२४ रोजी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जुनी गंगा देवी मंदिर कोपरगाव याठिकाणी सकाळी ठीक ०९.०० वाजता होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली आहे.आ.आशुतोष काळे यांनी ५ वर्षात मतदार संघातील असंख्य विकासाची कामे मार्गी लावून जनतेच्या अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीची दखल घेवून मतदार संघाच्या विकासाची गंगा अविरतपणे वाहत रहावी यासाठी महायुतीचे वतीने उमेदवारी त्यांना देण्यात आली आहे.कोपरगाव मतदार संघातील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून आ.आशुतोष काळे यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. रस्ते, पाणी, आरोग्य, पाण्याचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो किंवा सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या अडचणींचे कुठलेही प्रश्न असो याबाबत आ.आशुतोष काळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून कोपरगाव मतदार संघात विकास कामे करण्याच्या दूरदृष्टीतून भरघोस स्वरूपात निधी आणला. यातून शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये विविध योजना पोहोचविल्या. अनेक प्रलंबित कामांना मार्गी लावून विकास कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आहे. कोपरगाव मतदार संघामध्ये सुशिक्षित सुसंस्कारित असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून मतदारांचा हक्काचा कामदार आमदार म्हणून मतदारसंघात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला आहे. मागील पाच वर्षात कोपरगाव मतदार संघामध्ये केलेल्या विकास कामांच्या बळावर आ.आशुतोष काळे हे पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
मा.आ.अशोकराव काळे व महायुती व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आ. आशुतोष काळे यांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ जुनी गंगा देवी मंदिर कोपरगाव याठिकाणी सकाळी ०९.०० वाजता होणार आहे. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व महायुती व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे