महाराष्ट्र

जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य वृध्दीसाठी वेळोवेळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची गरज - गोरक्ष गाडीलकर

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य व क्षमता वृद्धी करण्यासाठी वेळोवळी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्याची गरज असल्याचे मत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केले.

जाहिरात
जाहिरात

आज शुक्रवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कोकमठाण येथील आत्मा मलिक गुरूकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, किरण सावंत, श्रीकुमार चिंचकर, प्रसाद मते, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त बाळासाहेब गोरडे आदी उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात

याप्रसंगी गाडीलकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महसूल विभागाच्या कामामुळे व्यस्त दिनक्रम असतो, ज्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे कठीण होते. मात्र, आरोग्य टिकवण्यासाठी नियमित व्यायाम, मॉर्निंग वॉक, किंवा खेळ महत्त्वाचे आहेत. सुदृढ शरीरातच सुदृढ आत्मा वास करतो, त्यामुळे आरोग्य चांगले असेल तर कामही उत्कृष्ट होते. असे ते शेवटी म्हणाले यानंतर अपर जिल्हाधिकारी कोळेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही दिवसांत या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले.

जाहिरात
जाहिरात

क्रिकेट, कबड्डी, आणि इतर क्रीडा प्रकारांच्या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी संयोजनासाठी विशेष मेहनत घेतली आहे. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व स्तरांवर सहकार्य मिळत आहे. असे ते शेवटी म्हणाले यानंतर नंदकुमार सुर्यवंशी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच खेळाडूंमधून राजेंद्र आंधळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ध्वजारोहण, मार्चपथ संचलन, मशाल प्रज्वलित करून व आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धांना सुरूवात झाली.

या क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर टायगर्स (जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर प्रांत, अहिल्यानगर तहसील व नेवासा तहसील ) अहिल्यानगर साऊथ वॉरीयर्स (कर्जत, जामखेड, श्रीगोंदा व पारनेर) अहिल्यानगर रॉयल्स (पाथर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर ) आणि प्रवरा पॅंथर्स (राहाता, कोपरगाव, अकोले व संगमनेर) या संघांनी सहभाग घेतला‌ आहे. या स्पर्धा १६ व १८ जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडणार आहेत. १६ जानेवारी रोजी या चार संघात १२ षटकांचे क्रिकेट सामने संपन्न झाले.

१७ जानेवारी रोजी पुरूष व महिला खेळाडूंचे १००, २०० व ४०० मीटर वैयक्तीक धावणे व ४०० मीटर रिले स्पर्धा, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुध्दीबळ, गोळाफेक, थाळीफेक, भाला फेक, लांब उडी उंच उडी या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. १८ जानेवारी रोजी फुटबॉलसह इतर सर्व क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामने संपन्न होऊन समारोप होणार आहे.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक आहेर यांनी केले. क्रीडा स्पर्धांचे संयोजन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत व राहाता तहसीलदार अमोर मोरे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे