संजीवनी उद्योग समूह

अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली भर पावसात पाहणी

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव मतदारसंघात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.अनेक भागातील सोयाबीन,कांदा,कांदा रोपे,मका,कपाशी या सारख्या पिकांचे नुकसान होण्याची परीस्थिती ओढवली आहे.काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी तहसीलदार महेश सावंत यांच्याशी संपर्क करून सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.पाणी साचलेल्या भागात पाहणी करून आवश्यक तेथे मदतकार्य करत अनेक ठिकाणी जेसीबी उपलब्ध करून देत पाण्याचा निचरा संजीवनी उद्योग समूहाने केला आहे.

तसेच घरात पाणी साठल्याने त्या कुटुंबा पर्यंत भोजन पोहचविण्याचे काम संजीवनी समूहाने केले आहे.एखाद्या कुटुंबा प्रमाणे रात्रीपासून संजीवनीचे पथक मैदानात उतरून कार्यरत असल्याने परीस्थिती आटोक्यात येण्यास मदत झाली.काल झालेल्या अतिवृष्टीमुळे जनतेचे अतोनात हाल झाले आहे.अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह जाण्यास जागा नसल्याने जे सी बी आवश्यक होता.विवेकभैय्या कोल्हे यांनी काल रात्री पासून परीस्थिती निवारण्यासाठी आवश्यक तिथे आपली यंत्रणा पाठवली.हेल्पलाईन द्वारे मदतीसाठी येणाऱ्या सूचना आणि मागणी नुसार सकाळी प्रशासनाला पाहणी करून सरकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे