आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या संचालकपदी प्रशांत घुले यांची बिनविरोध निवड

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव माधवराव घुले यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कुंभारीचे माजी सरपंच प्रशांत एकनाथराव घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव माधवराव घुले यांच्या रिक्त असलेल्या संचालकपदाच्या जागेसाठी विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्थेचे (साखर) अध्यासी अधिकारी बी.के.बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवार (दि.१५) रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी रिक्त असलेल्या संचालकपदाच्या जागेसाठी प्रशांत घुले यांच्या नावाची सूचना संचालक सुधाकर रोहोम यांनी मांडली सदर सूचनेस संचालक प्रवीण शिंदे यांनी अनुमोदन दिले. निर्धारित वेळेत प्रशांत एकनाथराव घुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे अध्यासी अधिकारी बी.के.बेंद्रे यांनी प्रशांत घुले यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे, कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देतांना नवनिर्वाचित संचालक प्रशांत घुले म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना हि सभासदांची व शेतकऱ्यांची कामधेनु असून हि कामधेनु कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उच्च शिक्षित, अभ्यासू नेतृत्व असलेल्या आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

जाहिरात
जाहिरात

प्रगतीपथावर असलेल्या निवडक सहकारी साखर कारखान्यांच्या यादीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची गणना होत आहे. माझ्या कुटुंबावर मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी आमदार अशोकरावजी काळे यांनी प्रेम केले असून माझे वडील स्व.एकनाथरावजी घुले यांना १९९४ ते १९९९ व १९९९ ते २००६ या कालावधीत संचालक व २००१ ते २००२ या कालावधीत कारखान्याच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. माझे चुलते स्व.शिवाजीराव घुले यांना देखील संचालक पदी काम करण्याची संधी दिली होती. परंतु त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर आ.आशुतोष काळे यांनी त्यांच्या जागेवर मला देखील संधी देवून संचालक म्हणून माझी निवड केली त्याबद्ल काळे परिवाराचे मी आभार मानतो. प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी काम करण्यासाठी मोठे भाग्य लागते. हे भाग्य मला मिळाले असून या संधीचे सोने करून कारखान्याच्या प्रगतीसाठी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे