संजीवनी उद्योग समूह

कर्मवीर भाऊराव पाटील यांची स्वावलंबनाची शिकवण काळाची गरज- विवेकभैय्या कोल्हे

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केबीपी विद्यालयाच्या परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर रॅलीची सांगता केबीपी विद्यालयात झाली.कमवा आणि शिका या माध्यमातून सुरू झालेली शिक्षणातून स्वावलंबन ही काळाची गरज आहे असे मत विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्था या नावातच रयत आहे.त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि गोरगरिबांच्या मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मोठे कार्य उभे केले.महाराष्ट्र आणि कर्नाटक इथवर रयत शिक्षण संस्थेचा विस्तार झाला आहे.अतिशय नामवंत शिक्षण संस्था म्हणून आज अभिमानाने रयत ओळखली जाते.लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून आजवर अनेक विद्यार्थी देश विदेशात उच्च पदावर विराजमान झाले आहे.स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी कर्मवीर अण्णांच्या शिक्षण प्रसाराला गतिमान करण्यासाठी मोठे काम रयत शिक्षण संस्थेत केले.उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आदर्श कारभार केला व संस्था वाढीसाठी मोठे योगदान दिले जी आमच्यासाठी प्रेरणा आहे.शिक्षण आणि त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उच्चशिक्षणाच्या कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात कोल्हे साहेबांनी वाटा निर्माण केल्या.कर्मवीर अण्णांचा शिक्षण क्रांतीचा विचार अतिशय समर्पक भावनेने कोपरगाव तालुक्यात देखील जपला गेला.रयत शिक्षण संस्थेच्या विकासात्मक वाटचालीत स्व.शंकरराव कोल्हे आणि स्व.शंकरराव काळे यांची मोलाची साथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना लाभली ही आपणा सर्वांसाठी एक प्रेरणादायी आठवण आहे असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कर्मवीर जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात निघालेल्या कर्मवीर रॅली मद्ये सहभागी हजारो विद्यार्थी विद्यार्थिनीना सुंगंधी दूध वाटप करण्यात आले.दरवर्षी विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविला जातो.या वाटपाच्या नंतर जमा झालेला सर्व कचरा हा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उचलून घेतला याचे कौतुक नागरिकांमधून झाले आहे.यावेळी पद्मकांत कुदळे,पराग संधान,बाळासाहेब नरोडे,गोपीनाथ गायकवाड,जगदीश मोरे,बोळीज सर,जयप्रकाश आव्हाड, रयत बँक संचालक दिपक भोये,
कन्या माध्यमिक शाळेच्या शेलार मॅडम, के.बी.पी. प्राचार्य खाडेकर सर, कन्या शाळा प्राथ.चे दरेकर सर, के.बी.पी. माध्य.श्री.शहाजी सातव सर, SSGM कॉलेज चे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत आदी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.सुगंधी दूध वाटप करण्यात आले या वेळी पराग संधान, डि. आर. काले,बाळासाहेब नरोडे,राजेंद्र सोनवणे, गोपीनाथ गायकवाड,दादासाहेब नाईकवाडे,सागर राऊत,रोहन दरपेल,जयप्रकाश आव्हाड,फकिरमंहमद पहिलवान,भानुदास पवार,सतिश रानोडे,नारायण गवळी,गोपीनाथ सोनवणे,जगदीश मोरे,हाशम शेख,योगेश डोके,संजय आढाव आदींसह मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे