कोल्हेंचे आंदोलन म्हणजे पावसाळ्यातील ‘भू-छत्र’—निलेश डांगे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, दुखतं पण, सांगता येत नाही आणि दाखवता येत नाही. अशीच काहीशी अवस्था सध्या कोल्हेंची झाली आहे. काही महत्वाच्या निवडणुकांमध्ये झालेला पराभव, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळेंना मिळालेले ऐतिहासिक सव्वा लाखाचे मताधीक्य त्यामुळे कुठे तरी आपण प्रवाहाच्या बाहेर लोटले जातो की काय, अशी शंकेची पाल कोल्हेंना स्वस्थ बसू देत नसावी. त्यामुळे कुठे तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आ.आशुतोष काळे यांच्यावर टीका करून, वावड्या उठवून कोल्हे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांचे हे आंदोलन म्हणजे पावसाळ्यात उगवणारे ‘भू-छत्र’ असून निवडणुका आल्या की, असे ‘भू-छत्र’ उगतातच. परंतु हे ‘भु-छत्र’ ना सावली देतं, ना पावसापासून बचाव करतं पण डोक्यावर ठेवून देखावा मात्र जोरात करतं अशी मार्मिक टीका कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे निलेश डांगे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कोल्हेंच्या आंदोलनावर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.प्रसिद्धी पत्रकात डांगे यांनी पुढे असे म्हटले आहे की, निवडणुकांची चाहूल लागली की, असे आंदोलनाचे ‘भू-छत्र’ मतदार संघात उगवतीलच पण त्याचा कोणताही परिणाम मतदार संघाच्या विकासावर होणार नाही.

आ.आशुतोष काळेंच्या विकासाचा धडाका यापुढेही असाच सुरु राहणार आहे. मात्र अशा आंदोलनातून कोल्हे मानसिक दृष्ट्या खचल्याचे जाणवते. सोशल मिडीयाचा जमाना आहे. प्रसिद्धीचे माध्यमांचे पर्याय मोठ्या प्रमाणात वाढले असून जनतेला वेड्यात काढणे एवढे सोपे राहिले नाही हे कोल्हेंना कधी कळणार? कोल्हेंकडे चाळीस वर्ष असतांना सुद्धा ते कोपरगाव शहराला पश्चिम भाग कोल्हे जोडू शकले नाही. ते काम माजी आमदार अशोकराव काळे यांनी धारणगाव-कुंभारी येथे पूल उभारून कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविली. त्यावेळी देखील कोल्हेंनी सत्तेची मस्ती व वेळप्रसंगी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष छुपा विरोध केलाच होता. हे जनतेला माहित असून कोपरगावच्या विकासाला खीळ घालणारे कोण आहे? हे जनतेला चांगलेच माहित आहे. त्यामुळे असे आंदोलन करून कोल्हे आपल्याच हाताने आपला तमाशा करून घेत आहे.यात त्यांची पण चूक नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोपरगाव शहराला किती निधी मिळवून दिला हे त्यांना चांगलेच माहित आहे आपल्यापेक्षा जास्त निधी आ.आशुतोष काळेंनी दिला आहे हे पण त्यांना व कोपरगावकरांना माहिती आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे त्यामुळे आपली पाण्याच्या गाजराची पुंगी कोपरगावकरांनी तोडून टाकली. कोपरगाव शहराचा विकास होत आहे, जनता समाधानी आहे, जी विकासकामे आपण करू शकलो नाही ती विकासकामे आ.आशुतोष काळेंनी करून दाखविली याचे शल्य कोल्हेंनाकुठे तरी बोचत आहे.

त्यामुळे पाणी प्रश्न सुटला यावर बोलायचे नाही, झालेल्या विकास कामांबद्दल बोलायचे नाही. मात्र जनतेचे लक्ष वेधण्यासाठी नाटकी आंदोलन करून जनतेच्या मनात सहानुभूती मिळवायची हा कोल्हेंचा सुरु असलेला केविलवाणा प्रयत्न त्यांची मानसिकता किती मोठ्या प्रमाणात खचली आहे हे दर्शविते.ज्यांनी कोपरगाव शहराच्या २८ विकासकामांना न्यायालयात जावून स्थगिती मिळविण्याचा असुरी आनंद घेतला त्यांना विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न कोल्हेंनी स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. त्यांचा सुरु असलेला खटाटोप येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उगवलेले ‘भू-छत्र’ आहे. हे ‘भू-छत्र’ ना सावली देतं, ना पावसापासून बचाव करतं, पण डोक्यावर ठेवून देखावा करतं हे न समजण्या इतपत कोपरगावची जनता दुधखुळी नाही हे कोल्हेंना कधी समजणार? असे प्रसिद्धी पत्रकात डांगे यांनी शेवटी म्हटले आहे.