सरकारकडून कोपरगावकरांना नमो उद्यानाचे खास गिफ्ट; स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आभार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव नगरपरिषदेला राज्य सरकारकडून विशेष भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने कोपरगाव शहरासाठी नमो उद्यान उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे कोपरगाव शहरात नागरिकांसाठी आधुनिक सुविधा असलेले सुंदर उद्यान उभारले जाणार असून, नागरिकांच्या आरोग्य आणि मनोरंजनासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे.

नरेंद्र मोदी हे आज जगभरात विश्वनेते म्हणून ओळखले जातात. भारताचा जागतिक स्तरावर दबदबा वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा अधिक सक्षम आणि प्रभावी बनली आहे. अशा महान नेत्याच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावकरांना हे अनोखे गिफ्ट मिळणे हा शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे.या विशेष उपक्रमाबद्दल नागरिकांच्या वतीने माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, या उद्यानामुळे शहराचे सौंदर्य वाढेल, नागरिकांना सकस आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल.

कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी असे निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहेत. नमो उद्यान कोपरगावचे नवे आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.