Breaking
संजीवनी उद्योग समूह

संस्कृती जपण्याचे काम संजीवनी युवा प्रतिष्ठान जोमाने करते आहे-विवेकभैय्या कोल्हे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य ढोल-ताशा स्पर्धा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.या स्पर्धेत मुंबादेवी तरुण मंडळाने प्रथम क्रमांक, तुळजा भवानी ढोल ताशा पथकाने द्वितीय क्रमांक, हिंदूवाडा मंडळाने तृतीय क्रमांक तर हत्ती गणपती मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या पथकांचे अभिनंदन करून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्व पथकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विजेता तरुण मंडळ,शिवराय तरुण मंडळ,प्रगत शिवाजी रोड सयुंक्त तरुण मंडळ, छत्रपती प्रतिष्ठान यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेत चांगले वादन केले याबदल त्यांचेही कौतुक करण्यात आले.प्रारंभी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी सुरेश विसपुते, कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक सोन्ने साहेब, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, कोल्हे कारखाना संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक रमेश घोडेराव, कलावंत ढोल ताशा पथक पुणे वादक रितेश माने, मनोज विसपुते, उत्तमराव मते आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी विकास किर्लोस्कर व कृष्णा कोळपकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

जाहिरात

या भव्य स्पर्धेत शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक ढोल-ताशा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेकडो तरुण-तरुणींनी पारंपरिक वेशभूषेत, शिस्तबद्ध पद्धतीने सादर केलेल्या अद्वितीय तालांनी संपूर्ण मैदान दणाणून टाकले. ढोल-ताशांच्या गजराने कोपरगाव शहर दुमदुमून गेले. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट तरुणाईमध्ये संस्कृती, परंपरा आणि एकता यांचे संवर्धन करणे हे होते. आपल्या संस्कृतीचा उज्ज्वल इतिहास जपत, पुढील पिढ्यांपर्यंत त्याची ओळख पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता असल्याचे विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.कोपरगावकरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकतेचे आणि संस्कृतीप्रेमाचे दर्शन घडवले. सर्व पथकांनी उत्कृष्ट वादन सादर केले. वाद्यसंस्कृती टिकून राहावी आणि ऐक्य, संघटन यासारख्या गुणांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संजीवनी युवा प्रतिष्ठान अशा उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी वाद्यप्रेमी कोपरगावकर, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »