गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर रंगणार आमदार क्रीडा महोत्सव

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आमदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते सोमवार (दि.४) रोजी सकाळी ११ वाजता होणार करण्यात येणर असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.या क्रीडा महोत्सवास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून राज्यातील विविध जिल्ह्यातील क्रिकेट, फुटबॉल, हॉकी तसेच हॉलीबॉल संघानी महोत्सवात सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी केली आहे.गौतम पब्लिक स्कूल खेळाचे माहेरघर असून संस्थेच्या सचिव व शाळा व्यवस्थापन यांच्या प्रयत्नांतून शाळा विविध खेळांच्या विस्तीर्ण व आकर्षक मैदानांनी सुसज्ज आहे. यामुळे दरवर्षी विविध खेळांत गौतम पब्लिक स्कूल राज्याचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर करते.संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस क्रीडा महोत्सवाचे आयोजन करून साजरा करण्याची परंपरा गौतम पब्लिक स्कूलने सुरू केली आहे.

त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती, नेतृत्व क्षमता, स्वयंशिस्त, संघ भावना आदी गुणांचा विकास होण्यास मदत होईल असा विश्वास प्राचार्य नूर शेख यांनी व्यक्त केला. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी नमूद करून राज्यातील जास्तीत जास्त संघानी क्रीडा महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.आमदार क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, पर्यवेक्षिका ज्योती शेलार व सर्व हाऊस मास्टर्स मेहनत घेत आहे.