शुक्राचार्य देवस्थान ८०लाखांच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जगातील एकमेव मंदिर म्हणून ओळख असलेल्या कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदीर व परिसराच्या विकासासाठी निधी मिळावा. यासाठी केलेल्या प्रयत्नातून ८० लाख रुपयांच्या विकास कामांच्या निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.जगात एकमेव असलेल्या कोपरगाव शहराच्या बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये सद्गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या भक्तीमय कार्यक्रमात आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होवून गुरु शुक्राचार्य यांचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी हि माहिती दिली.ते म्हणाले की, महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. राज्यातील विविध भागात अनेक प्राचीन मंदिरे असून त्या-मंदिराबाबत पुराणामध्ये या प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास सांगण्यात आला आहे, त्याप्रमाणे आपल्या कोपरगाव शहराला देखील धार्मिक,ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. या वारशामध्ये कोपरगाव बेट परिसर गुरु शुक्राचार्याचे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते.

याच ठिकाणी त्यांनी तप व वास्तव्य केले होते व याच पवित्र भूमीवर त्यांचा आश्रम होता, अशी इतिहासात नोंद आहे. असे ऐतिहासिक व जगात एकमेव असणाऱ्या मंदिरात कोणताही मुहूर्त न पाहता सर्व धार्मिक विधी करता येतात. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मिळणाऱ्या सोयी सुविधामध्ये वाढ व्हावी व भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा मिळाव्यात मिळाव्यात यासाठी शासनाने केलेल्या पाठपुराव्यातून ८० लाखाच्या विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भक्त निवास, मंदिराची कमान तसेच मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाची अनेक कामे असून लवकरच या कामांना प्रारंभ होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.