साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या कामात आ.काळे यांनी समाज बांधवांची माफी मागावी – विवेकभैय्या कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असनाऱ्या नाट्यगृहासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असे दाखवत भूमिपूजन सुद्धा थाटामाटात पार पडले त्यानंतर निविदा रद्द केली. या कामात आ. आशुतोष काळे यांच्याकडून केवळ प्रसिद्धी केली गेली मात्र त्यानंतर आजपर्यंत एक रुपयाचेही काम झालेले नाही. या कामाचा ठेका लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकाच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला दिला गेल्याचे समजते, हे अतिशय धक्कादायक आहे अशी भावना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी थेट नाट्यगृहाची पाहणी समाज बांधवांसमवेत केली. या विकास कामाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल लोकप्रतिनिधी यांचा निषेध उपस्थित सर्वांनी केला आहे.हे नाट्यगृह केवळ एक इमारत नाही, तर अनेक गोरगरीब कुटुंबांचे लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, नगरपालिकेच्या शाळांचे गॅदरिंग अशा असंख्य आठवणी आणि सामाजिक उपक्रमांचे साक्षीदार राहिलेले एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. या ठिकाणी अशोक सराफ, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी परफॉर्मन्स केला आहे म्हणजेच या स्थळाचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे.आज मात्र ते पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. या नाट्यगृहाचे नाव अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आहे आणि त्यांच्या नावाला, त्यांच्या कार्याला महान करण्याऐवजी हे दुर्लक्ष म्हणजे एक प्रकारे अवमान आहे.

आमदारांनी चांगले काम व्हावे, यासाठी नागरिकांनी जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन पूर्वी केले होते, त्यामुळे आज आम्ही सर्व जबाबदार नागरिक म्हणून कामाची पाहणी करण्यासाठी आलो आहे असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळात या नाट्यगृहासाठी तब्बल ८ कोटी रकमेचा प्रस्ताव दाखल केला होता, त्यापैकी २ कोटी रुपये वर्ग सुद्धा झाले होते. मात्र सध्याच्या आ.काळे यांनी त्या निधीची योगदान नसतांना देखील इतर कामांसाठी वळवा वळवी केली, हे दुर्दैवी आहे. नाट्यगृहाकडे केलेले हे जाणीवपूर्वक केलेली चूक असून त्यांनी जनतेची आणि समाज बांधवांची माफी मागणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे अशी मागणी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.उपस्थित शरदनाना थोरात, डी. आर. काले, बबलू वाणी, विनोद राक्षे, राजेंद्र बागुल, जितेंद्र रणशूर, प्रशांत कडू, सोमनाथ मस्के, शरद त्रिभुवन, फकीरा चंदनशिव, सुजल चंदनशिव, अनिल जाधव, बापू पवार, अर्जुन मरसाळे, अनिल पगारे, रवींद्र शेलार, अभि मंडलिक, गोरख देवडे, ताकोले हे कार्यकर्ते उपस्थित होते.