कोळपेवाडीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबीर-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील हजारो नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यासाठी गावोगावी महाराजस्व अभियान राबवून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. यासाठी वेळप्रसंगी स्वत:ची यंत्रणा देखील उभी केली आहे.परंतु अजूनही काही पात्र लाभधारक नागरीक शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी शुक्रवार (दि.२५) रोजी कोळपेवाडी येथे सुरेगाव गटातील नागरीकांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महायुती शासनाने नागरीकांच्या सोयीसाठी अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्याची मोहीम हाती घेतली असून मंडळ स्तरावर श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरात महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर कोळपेवाडी येथील श्री महेश्वर मंदिरात शुक्रवार (दि.२५) रोजी सकाळी १०.०० वा. समाधान शिबिर होणार आहे. या शिबिरात जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल,तसेच इतर शैक्षणिक दाखले,शिधा पत्रिका, संजय गांधी योजना, पंचायत समिती व कृषी विभागाच्या विविध योजना, महिला व बाल विकास, शिक्षण विभाग,वन विभाग, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, पशुधन विभाग आदी विभागांच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांना घेता येणार आहे.

शासन आपल्या दारी’ हि संकल्पना सत्यात उतरवून या अभियानाच्या माध्यमातून शासन निश्चितपणे मतदार संघातील नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवले असून ग्रामीण भागातील जनतेसाठी हि संकल्पना फायदेशीर ठरली आहे. छत्रपती शिवरायांच्या लोकाभिमुख प्रशासनाची प्रेरणा घेऊन, प्रत्येक नागरिकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी महायुती शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, समाधान शिबीर ही सुरू केलेली एक महत्वाची लोकाभिमुख योजना असून महसूल विभागाशी सबंधित असणाऱ्या नागरिकांच्या विविध समस्या एकाच छताखाली एकाच वेळी सहजपणे सोडविल्या जाव्यात हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी सुरेगाव गटातील नागरीकांनी महसूल विभागाशी संबंधित असलेली कामे व विविध दाखले मिळविण्यासाठी या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.