रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल व रोट्रॅक्ट क्लब ऑफ संजीवनी युनिव्हर्सिटीच्या पदग्रहण समारंभ संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अल्पावधीतच रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलने मतदान जनजागृती, बालविवाह प्रतिबंधक रॅली, करिअर गायडन्स सेंटर ,ऑनलाइन टीचर्स ट्रेनिंग, भव्य सायक्लोथॉन, योगा ट्रेनिंग, वृक्षारोपण, झेडपी शाळांना स्टेशनरी, सायकल, एलईडी स्मार्ट लर्निंग पॅनल, कॉम्प्युटर , आटा चक्की, ओपन जिम इत्यादी उपक्रम राबवून रोटरीच्या उज्वल भविष्याची पेरणी करून ठेवली आहे. रोटरी क्लब ही जागतिक संघटना असून ३३ हजार पेक्षा जास्त क्लब जगात पसरले आहेत आणि याचा उपयोग नवीन समाजकार्य घडविण्यासाठी होतो. प्रत्येक रोटरी क्लब हा समाजातील विविध घटकांची गरज ओळखून त्यावर आधारित उपक्रम करण्यावर भर देतात आणि त्यामुळेच आज रोटरी ला संपूर्ण जगात विशेष मान मिळतो. रोटरीचे सर्वात मोठे यश म्हणजे पोलिओ उच्चाटन यानंतरही भविष्यात अनेक कार्यांवर रोटरी काम करणार आहे , रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल ही सर्व स्तरात काम करणारी संघटना म्हणून प्रसिद्ध झाली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन माजी जिल्हा गव्हर्नर (पीडीजी ) प्रमोद पारीख यांनी आपल्या भाषणातून जाहीररीत्या स्पष्ट केले आणि रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलच्या मागील पाच वर्षात केलेल्या समाजकार्यांचाही आढावा घेतला.रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ संजीवनी युनिव्हर्सिटीच्या पदग्रहण समारंभात माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रमोद पारिख हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संजीवनी विध्यापिठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे , सहाय्यक प्रांतपाल रविकिरण डाके, माजी अध्यक्ष राकेश काले, माजी सचिव विशाल आढाव, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विनोद मालकर, सचिव विक्रम लोढा हे उपस्थित होते.या कार्यक्रमात रोटरी क्लबचे सहाय्यक प्रांतपाल रविकिरण डाके यांनी प्रांतपाल सुधीर लातूर यांच्याकडून आलेला प्रेरणादायी शुभेच्छा संदेश प्रस्तुत केला. महत्त्वाचे म्हणजे याप्रसंगी रोट्रॅक्ट क्लब ऑफ संजीवनी युनिव्हर्सिटी ची सुद्धा स्थापना करण्यात आली आणि चार्टर अध्यक्ष म्हणून साक्षी राऊत आणि सचिव सिद्धी चुत्तर यांची निवड आणि पदग्रहण संपूर्ण करण्यात आले.

चार्टर अध्यक्ष रोहित वाघ यांनी आपल्या क्लबच्या जीवन प्रवासाची एक प्रेरणादायी चित्रफीत सादर केली. मावळते अध्यक्ष राकेश काले यांनी वर्षभरातील सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला आणि आपल्या अनुभवांचा खजिना प्रस्तुत केला. यावेळी त्यांनी प्रेसिडेंट कॉलर गोँग आणि ग्यावेल नवनिर्वाचित अध्यक्षांना हस्तांतरित करून पदग्रहण करण्याचे निमंत्रण दिले.नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विनोद मालकर यांनी चालू वर्षातील पूर्वनियोजित उपक्रमांची यादी मांडली. क्लबमधील सर्व सदस्य आणि रोट्रॅक्टर सोबत घेऊन क्लबला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचे मानस दर्शविले. त्याचबरोबर रोट्रॅक्टरच्या चार्टर प्रेसिडेंट साक्षी राऊत यांनी आपल्याला दिलेल्या जबाबदारीचे पूर्णपणे निर्वाहन करण्याचे वचन दिले आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी विशेषतः महिला आणि तरुण पिढीच्या सबलीकरणासाठी रोट्रॅक्ट मार्फत काही ना काही काम करण्याचे सुतोवाच केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना खजिनदार वीरेश अग्रवाल यांनी आपल्या मुश्किल शैलीने अनेकांची मने जिंकली. सदरील कार्यक्रमास बोर्ड ऑफ डायरेक्टर देखील घोषित करण्यात आले. शेवटी अमर नरोडे यांनी आभार मानले. याप्रसंगी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, सर्विस डायरेक्टर सुमित कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आणि नवीन सदस्य ए.जी. ठाकूर, प्रकाश जाधव, रावसाहेब शेंडगे, इमरान सय्यद, कपिल पवार, हर्षल दोषी, शिवम गीर तसेच रोट्रॅक्ट क्लबची नूतन खजिनदार तिथी मालकर, रोट्रॅक्टर अथर्व चव्हाण, भक्ती लहारे, प्रचिता तनपुरे, वैभव गारे, पियुष बागुल, जय भालेराव, अक्षदा दाते, अथर्व देशमुख, यश धोकचौले, तनुजा गायकवाड, प्रणव घुमरे, कार्तिक गोरडे, शिवम जाधव, श्वेता पलांडे, श्वेता थोरात उपस्थित होते.