संजीवनी उद्योग समूह

आगामी काळातील निवडणुकांमध्ये गुलाल आपलाच असेल – युवानेते विवेकभैय्या कोल्हे

0 6 0 0 2 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

भारतीय जनता पार्टीच्या कोपरगांव तालुकाध्यक्षपदी विशाल किसनराव गोर्डे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल वारी पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम वारी येथील जगदंबा माता मंदिरा जवळील सभागृहात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.यावेळी विशाल किसनराव गोर्डे यांचा सत्कार करून त्यांना भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांना तळागळापर्यंत घेऊन जाण्यासाठी पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या सत्कार समारंभात भाजप ज्येष्ठ नेते शरदनाना थोरात, माजी सभापती एम.एस. टेके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम, औद्योगिक वसाहत उपाध्यक्ष केशवराव भवर, युवा मोर्चा मा.तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, संचालक बापूसाहेब बारहाते, सुरेशभाऊ जाधव, विष्णुपंत क्षिरसागर, सरपंच प्रदीप चव्हाण, डॉ. सर्जेराव टेके, ॲड. अमोल टेके, सरपंच अनुराग येवले, सरपंच जयराम वारकर, रेवनशेठ निकम, प्रकाश गोर्डे, फकिरराव बोरनारे, दिव्यांग सेल अध्यक्ष मुकुंद काळे,युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोपरगांवसह वारी, कान्हेगांव, संवत्सर, कोकमठाण, सडे, भोजडे, धोत्रे, खोपडी, तळेगांव मळे, लौकी, घोयेगांव, उक्कडगांव या परिसरातील अनेक गावांतील सहकारी,कार्यकर्त्यांनी या सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या प्रसंगी मच्छिंद्र पा. टेके यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला व गोर्डे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कांगोरे व्यक्त केले.या प्रसंगी शुभेच्छा देताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले विशाल गोर्डे याची नावाप्रमाणे जगात सर्वात मोठा असणाऱ्या विशाल पक्षाच्या पदावर निवड झाली आहे. पंतपाधन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी जनविकासाची कामे मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे. सामाजिक कार्य हा स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या पासून आपला पिंड राहील आहे.विशाल गोर्डे यांनी आजवर मला सातत्याने सामाजिक कार्यासाठी काळ वेळेचा विचार न करता संपर्क केला आहे.

जाहिरात
जाहिरात

नागरिकांना कोरोना काळात वैद्यकीय मदत,पाणी प्रश्नात प्रयत्न, गोर गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा आग्रह नेहमी असल्याने एक सामाजिक जाणीव असणाऱ्या नेतृत्वाला ही संधी मिळाली आहे. सेवा हाच धर्म ही आपली भावना असल्याने आगामी काळातील सर्व निवडणुकात गुलाल आपला असेल असे कोल्हे यावेळी म्हणाले.कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी विशाल गोर्डे यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.सत्काराला उत्तर देताना विशाल गोर्डे यांनी पक्षनेतृत्वाने आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी जी संधी दिली आहे ती कामाच्या रूपाने सोने करून दाखवेल असा विश्वास व्यक्त करत सर्वांची साथ आगामी काळात रहावी अशी अपेक्षा व्यक्त करून आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे