संजीवनीच्या पाच अभियंत्यांना सॅप कोर्समुळे दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आपल्या विद्यार्थ्याना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने परदेशी विद्यापीठे व नामांकित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. अशाच करारातुन सॅप (सिस्टिम्स, अॅप्लिकेशनस् अँड प्रॉडक्टस् ईन डेटा प्रोसेसिंग) या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीचे प्रशिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण घेत असतानाच दिले.
मी कोपरगांव तालुक्यातील मळेगांवथडी येथिल शेतकऱ्याची मुलगी. आमच्या परीवारातील इंजिनिअर होणारी मी पहिली मुलगी आणि नोकरीसाठी बाहेर पडणारीही पहिलीच. मी स्वावलंबी व्हावे ही माझ्या पालकांची इच्छा म्हणुन त्यांनी मला विश्वासाने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी दाखल केले. मीही जिध्दीने अभ्यास केला. शेवटच्या वर्षात असताना सॅपचा कोर्स केला. येथेच सॅप कोर्सची सोय असल्यामुळे मला इतर कोठे जाण्याची गरज पडली नाही. शेवटच्या सत्रात असताना आमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने टेक महिंद्रा कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले. सॅपच्या कोर्समुळे कंपनीला अपेक्षित असणारे सॉफ्टवेअर्सचे ज्ञान मला होते. तसेच माझी मुलाखतीची भरपुर तयारी करून घेण्यात आली होती. कंपनीच्या प्रतिनिधिंनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी आत्मविश्वासाने उत्तरे दिली आणि माझी चांगल्या पगारावर नोरीसाठी निवड झाली. ज्या विश्वासाने मी प्रवेश घेतला होता, तो संजीवनीने सार्थ केला आणि माझ्या पालकांचे आणि माझे स्वप्न पुर्ण झाले.-नवोदित अभियंता दिप्ती खोंड
या प्रशिक्षणाच्या जोरावर अॅटलस कॉप्को या कंपनीने दोन व टेक महिंद्रा या कंपनीने तीन अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करून चांगल्या पगाराही दिला, अशी माहिती महाविद्यालयाच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.स्वीडनमध्ये मुख्यालय असलेल्या अॅटलस कॉप्को या कंपनीने मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या अस्मिता अमोल आहेर व मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या साक्षी अभिजीत भोंगळे यांची निवड केली. टेक महिंद्रा या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या दिप्ती शिवाजी खोंड व सायली अजय भिंगानिया आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या आश्रय सुनिल दिवान यांची निवड केली.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले अभियंते व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.