संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

शेतक-यांनी इफको नॅनो खताबरोबरच उस पिकात कृत्रीम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवावे-बिपीनदादा कोल्हे

0 5 4 1 2 4

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

साखर उद्योगात प्रचंड स्पर्धा आहे, दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत आहे, शेतक-यांनी इफको नॅनो खताबरोबरच उस पिकात कृत्रीम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवावे, कार्यकारी संचालक, साखर सरव्यवस्थापक, उस विकास अधिकारी, आणि शेतकी विभागाशी निगडीत अधिका-यांनी या परिससंवादातुन आत्मसात केलेले ज्ञान थेट सभासद उस उत्पादक शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे त्यातुन कारखान्याबरोबरच परिसराचा विकास साधावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. इफको नविदिल्ली व संजीवनी ग्रुपच्या सहकार्याने शुक्रवारी शिर्डी येथील मॅरीगोल्ड रिजेन्सी येथे उस पीक खत व्यवस्थापनात नॅनो खतांचा वापर, कृत्रिम बुध्दीमत्तेचा उस उत्पादन व साखर उता-यात प्रभावी वापर या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यांत आला होता त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते. राज्यभरातील विविध साखर कारखान्यांच्या २०० प्रतिनिधींनी यात सहभाग नोंदविला. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक यु. आर. तिजारे प्रास्तविक करतांना म्हणांले की, आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्षात साईबाबांच्या नगरीत इफको व संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या सहकार्याने हा परिसंवाद आयोजित करता आला ही समाधानाची बाब असुन ३६ हजार सहकारी संस्थेच्या माध्यमांतुन हरितक्रांतीशी इफको आणि शेतक-यांचे ५८ वर्षाचे नाते असुन यातुन संपुर्ण जगभर विविध खते व शेतीविषयक औषधे यावर संशोधन सुरू आहे. पाणी आणि खताच्या अधिक वापरामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस कमी होत आहे म्हणून इफकोने नॅनो तंत्रज्ञानातुन ९४ पिकांवर २१ कृषी विद्यापीठात ३ लाख शेतक-यांच्या शेतात प्रत्यक्ष चाचण्या घेवुन नॅनो युरिया व डीएपी खते, विविध किटकनाशके तयार केली ही अभिमानाची बाब आहे. नॅनो खत मात्रा प्रभावी वापरासाठी सध्या इफकोची शेतक-यांमध्ये जनजागृती सुरू आहे. उस शेतीबरोबरच अन्य पीक उत्पादनांतुन शेतकरी उन्नती व्हावी हा मुख्य उददेश आहे असे ते म्हणाले बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, औद्योगिक विकासाचा पाया अधिक मजबुत करण्यांसाठी साखर उद्योग हा मुख्य घटक आहे. मात्र अलिकडच्या काळात त्याकडे सर्वाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. कापड उद्योगाप्रमाणेच साखर उद्योगाची अवस्था सुरु आहे. शेतकरी कामगार व त्यावर अवलंबुन असणार सर्वच घटक टिकले पाहिजे सहकार क्षेत्राने या राज्याबरोबरच देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे, मात्र त्याच्यासमोर आता खाजगीचे आव्हान उभे राहिले आहे. सहकार वाचला पाहिजे. एफआरपी देतांना साखर कारखान्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे, तेंव्हा साखरेसह इथेनॉल विक्रीचा दरही त्या प्रमाणांत वाढला पाहिजे, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने पावले उचलावी, ज्यांच्याकडे उसाची प्रत्यक्ष उपलब्धता आहे त्यांनाच गाळप क्षमता वाढविण्यांची परवानगी द्यावी अन्यथा यातुन अनेक प्रश्न निर्माण होतील. आज जग दिवसेंदिवस जवळ येत आहे. १८० दिवस चालणारा हंगाम आता ८० ते ९० दिवस चालत आहे. शेतक-यांची प्रति एकरी उस उत्पादकता दिवसेंदिवस कमी होऊन ती अवधी २५ टनांपर्यंत खाली आली आहे. ठिबक सिंचनाबरोबरच, आर्टिफिशियल इंटेलीजिअन्स (एआय) (कृत्रीम बुध्दीमत्ता) चा प्रभावी वापर उस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी व्हावा ही अपेक्षा, या परिससंवादातील ज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावे त्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, जगात अन्न वस्त्र निवारा याबरोबरच तंत्रज्ञान ही चौथी गोष्ट प्रत्येकाला गरजेची झाली आहे. युवापिढी त्यात वाकबगार आहे

जाहिरात
जाहिरात

असेही ते म्हणाले.इफको (पुणे) चे वरिष्ठ विपणन डॉ एम. एस. पोवार यांनी उस पीक खत व्यवस्थापनामध्ये इफको नॅनो खतांचा वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, तर उस उत्पादन व साखर उता-यात वाढ यासाठी एआय कृत्रिम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर याविषयी मृदा शास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ डॉ विवेक भोईटे, वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट (पुणे) चे पीक उत्पादन व संरक्षणातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतक-यांच्या छोटया छोटया चुका दुरूस्त करण्यावर भर द्या, प्रगत तंत्रज्ञान त्याच्या अभ्यासातुन पीक उत्पादन वाढ शक्य आहे हा विश्वास शेतक-यांना पटवून द्या, उस पिकाबरोबरच अन्य पीकावर येणा-या रोग किडींचा वेळीच बंदोबस्त करा, बारामती कृषी विज्ञान केंद्र व मायक्रोसॉफ्ट या दोघांच्या मदतीने उस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञान विकसीत करण्यांत आले आहे त्याच्याशी सुमारे ९ लाख शेतकरी जोडले गेले आहेत, एआय तंत्रज्ञान वापरामुळे शेतक-यांच्या उत्पादनांत हमखास ३० टक्के वाढ होवुन खर्चात ४० टक्के बचत विविध प्रयोगांती सिध्द झाल्याचे विवेक भोईर यांनी यावेळी सांगितले. इफको एम. सी. (पुणे) चे विभागीय विपणन व्यवस्थापक दौलतराव बोरस्ते यांनी उस रोग व कीड व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन करून अधिका-यांच्या शंकांचे निरसन करून इफकोच्या विविध कीटकनाशक उत्पादनाविषयी माहिती दिली. शेवटी इफको अहिल्यानगर व कोपरगावचे क्षेत्रीय अधिकारी वैभव ढेपे, तुषार गोरड यांनी सुत्रसंचलन करूनआभार मानले. कार्यकम यशस्वीतेसाठी केन मॅनेजर जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सी. एन . वल्टे व त्यांच्या सर्व सहकारी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे