संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी युनिव्हर्सिटी व सिनिअर कॉलेज आयोजीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

0 5 3 7 0 0

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

ग्रामिण विकासासाठी जैव अर्थव्यवस्थेची (बायो इकॉनॉमी) भुमिका महत्वपूर्ण ठरेल. भारताची जैव अर्थव्यवस्था २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्स पर्यंत जाईल. त्यासाठी भारत सरकारचे बायो-ईथ्री (एम्ल्पॉयमेंट, एनव्हायरनमेंट, इकॉनॉमी) धोरण महत्वपुर्ण ठरेल. संजीवनी जागतिक दर्जाचे ज्ञान देत असुन तरूणांनी सरकारी योजनांचा लाभ घेवुन ग्रामिण विकासाला हातभार लावावा. या परीषदेच्या माध्यमातुन बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनातून नाविण्यपुर्ण कल्पना समोर येतिल, असे प्रतिपादन नाशिक महसुल विभागाच्या डेप्युटी कमिशनर श्रीमती उज्वला बावके-कोळसे यांनी केले.मायक्रोबायोलॉजिस्टस् सोसायटी, इंडियाच्या सहकार्याने संजिवनी युनिव्हर्सिटी व सिनिअर कॉलेजने आयोजीत केलेल्या ‘इनोव्हेशनस् इन बायोटेक्नालॉजी रिसर्च फॉर सस्टेनेबल बायोरिसोर्सेस अँड बायोइकॉनॉमीः चॅलेंजेस अँड प्रक्टिसेस’ या विषयावरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून श्रीमती बावके-कोळसे बोलत होत्या. यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, मायक्रोबायोलॉजी सोसायटी, इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. ए.एम. देशमुख, इंडियन नॅशनल सांयन्स अकॅडमी, नवी दिल्लीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. ब्रजेश पांडे, रिलायंस लाईफ सायन्स, मुंबईचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आश्विन गजरा, व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर, प्राचार्य डॉ. एस.बी. दहिकर, थायलंड मधिल प्रिन्स ऑफ सोंग्क्ला युनिव्हर्सिटीचे प्रा.सुट्टावॅट बेंजाकुल, रशिया मधिल उरल फेडरल युनिव्हर्सिटीच्या प्रा. एलेना कोवालेवा, आघरकर रिसर्च इन्स्टिटयूट , पुणेचे डॉ. कमलेश जांगिड, पंजाब मधिल नॅशनल आगरी फुड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट्सचे डॉ.शिवराज निळे, रसिया मधिल सरतोव स्टेट फेडरल युनिव्हर्सिटीचे डॉ. तात्याना वाय. कलयुता,

जाहिरात
जाहिरात

कंबोडिया मधिल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नालॉजीचे प्रा. रिझमे टॅन, पुण्याचे अविनाश साळुंके, आरोग्य मंत्रालय, नवी दिल्लीचे डॉ. अजय कांबळे, गांधीनगर युनिव्हर्सिटी, गुजरातचे डॉ. डी. के. आचार्य, डॉ. आर.एस.शेडगे , परिषदेच्या आयोजन सचिव डॉ. सरीता भुतडा, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या परीषदेत संशोधक, प्राद्यापक, विद्यार्थ्यी, उद्योजक, पी.एचडी स्कॉलर, अशा ७४७ जनांनी सहभाग नोंदविला. यावेळी शोधनिबंध स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना पुरस्कार देवुन सन्माणित करण्यात आले.प्रारंभी प्राचार्य डॉ. दहिकर यांनी सर्वांचे स्वागत करून परिशदेचे उद्धिष्ट स्पष्ट केले. डॉ. ठाकुर यांनीही सर्वांचे स्वागत करून संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांची माहिती दिली. अमित कोल्हे म्हणाले की कोपरगांव सारख्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी विषयावर मार्गदर्शन न करण्यासाठी परदेशातुन तज्ञ आले आहेत, ही सर्वांच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे. यातुन संजीवनी राष्ट्र उभारणीसाठी प्रयत्न करीत आहे, हे स्पष्ट होते. डॉ. पांडे म्हणाले की येथुन पुढील काळात जैवतंत्रज्ञानात एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटिलीजंसची (कृत्रिम बुध्दिमत्ता) भुमिका महत्वपुर्ण असणार आहे. यामुळे जैव उत्पादनांचा खर्च कमी होईल व ती सर्वसामान्यां नाही परवडेल.डॉ. गजरा म्हणाले की भारत जैव उत्पादनामध्ये महत्वाची भुमिका साकारत आहे.यामध्ये बायोएन्झाईन, बायोसिमीलर क्षेत्रामध्ये संशोधकांसाठी जागतिक पातळीवर मोठ्या संधी उपलब्ध आहे. डॉ. देशमुख म्हणाले की संजीवनी ग्रामिण भागात असुनही नवतरूणांना आधुनिक ज्ञान देण्यात अग्रभागी आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बायो इर्थी हे विधायक संमत करून तरूणांसाठी मोठी संधी निर्माण केली आहे. तरूणांनी या आधारे बायेटेक्नॉलॉजी व मायक्रोबायोलॉजीच्या माध्यमातुन रोजगार निर्माण करावा. यासाठी मायक्रोबायोलॉजी सोसायटी आर्थिक मदतीसह सर्व मदत करायला तयार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे