आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

घारीच्या सरपंचपदी काळे गटाचे संदीप पवार बिनविरोध

0 5 3 7 0 0

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

जिथे जिवंत माणसाला दिलेल्या वचनांचा विसर पडतो तिथे ज्या व्यक्ती आपल्यात नाही त्यांना दिलेल्या वचनाचा तर कोणीच विचार करत नाही. मात्र हा समज आ.आशुतोष काळे यांनी खोटा ठरविला असून माझे चुलते स्व.शांतीलाल पवार यांना दिलेला शब्द पूर्ण करून मला सरपंचपदाची संधी दिली. राजकारणात दिलेला शब्द पाळणारा नेता हा विश्वास, समर्पण आणि प्रामाणिकतेचं प्रतीक असून आ.आशुतोष काळे दिलेला शब्द पाळणारे आदर्श नेतृत्व असल्याची भावनिक प्रतिक्रिया कोपरगाव मतदार संघातील घारी गावचे नवनिर्वाचित सरपंच संदीप पवार यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.ठकुबाई किसन काटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी निर्धारित वेळेत संदीप रंगनाथ पवार यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या मंडलाधिकारी श्रीमती कोल्हे यांनी सरपंचपदी संदीप पवार यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले. यावेळी सरपंचपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांनी सांगितले की, घारी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य चुलते स्व.शांतीलाल पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींचे कोविड काळात दुदैवी निधन झाले झाल्यामुळे पवार परीवाराचा समाजकारणाचा वारसा पुढे चालविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी स्व.शांतीलाल पवार यांच्या जागेवर सदस्य पद दिले.

जाहिरात
जाहिरात

आणि आता दिलेला शब्द पूर्ण करून सरपंचपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात दिलेला शब्द पाळणे, हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. जो नेता आपला शब्द पाळतो, त्याचं आदर्श नेतृत्व जनतेच्या विश्वासाचं प्रतीक मानलं जातं.राजकारणात दिलेला शब्द पाळणारे नेते हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहे. यामध्ये आ.आशुतोष काळे अग्रभागी असून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच संदीप पवार यांनी सांगितले आहे. यावेळी तलाठी प्रसाद पवार, ग्रामविकास अधिकारी जालिंदर पाडेकर, मावळत्या सरपंच सौ.ठकुबाई काटकर, उपसरपंच सौ.कृष्णाबाई पवार, सदस्य रामदास जाधव, अविनाश खरात, लक्ष्मण पवार, यमाजी पवार, सतीष पवार, किसन काटकर किरण होन अविनाश पवार, वैभव पवार,राजवर्धन जाधव, के.डी.जाधव, ज्ञानेश्वर पवार, द्वारकानाथ पवार, भानुदास होन, दादा‌भाई पठाण, सुनिल पवार, वसीम पठाण, सौरभ पवार, सोमनाथ काटकर, निखील पवार, विक्रम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंचपदी संदीप पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे