संजीवनी उद्योग समूह

मा.मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमीत्त कोल्हे कारखाना कार्यस्थळावर प्रेरणादिन साजरा

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

जी माणसं गोड असतात ती दुस-याला ओढ लावतात, या परिसरात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संघर्षांतुन संजीवनीचं साम्राज्य उभं केलं, त्याचं आयुष्यच आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज पादुका स्थान ट्रस्ट (देहु) चे विश्वस्थ, प्राचार्य प्रदिप कदम यांनी केले.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतुन व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या विचारातुन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ९६ व्या जयंतीनिमीत्त सोमवारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाबरोबरच तालुक्यात तसेच अहिल्यानगर जिल्हयात व राज्यात प्रेरणादिनाचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य प्रदिप कदम बोलत होते.प्रारंभी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे कार्य कर्तृत्व अनेकांना प्रेरणा आहे. जिदद, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि चिकाटी हे स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वभाववैशिष्टय आहे. त्यांच्या कार्याचा राज्यात दरारा होता. कृषी संशोधक दत्तात्रय कोल्हे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शिक्षणांतुन त्यांनी या परिसराचा कायापालट केला आणि आयुष्यभर विद्यार्थी दशेत राहुन माहित नसलेल्या असंख्य गोष्टींचे ज्ञान आत्मसात केले, स्वतःमधील अज्ञान दुर केले.

जाहिरात
जाहिरात

सार्वजनिक जीवनांत त्यांची सावली म्हणूनच आम्ही वाढलो.प्राचार्य प्रदिप कदम पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी फोर्ड फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीतुन परदेशात कृषी शिक्षण मिळविले, आयुष्यभर काळया आईची-शेतीची सेवा केली. तिला आधुनिक तंत्रज्ञानचे धडे दिले. शेतक-यांचे प्रतिएकरी उत्पन्न वाढविले., त्यांच्या ज्ञानाचा डोळा सतत उघडा होता. त्यांनी ज्या ज्या कामांना स्पर्श केला ते सोन्यासारखे झाले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोडीला जीवाजी होते म्हणून बलाढ्य अफजलखाना सोबत लढाईत शिवाजी महाराजांना होणारा दगाफटका करणाऱ्या शत्रूला मात मिळाली.यातून एक शिकता येते सहकाऱ्यांची निवड उत्तम असेल तर यशाची जबाबदारी निश्चित पार पडते तद्ववत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कष्टकरी, उस उत्पादक सभासद, शेतक-यांच्या मदतींने सहजानंदनगरच्या खडकाळ माळरानांवर हिरवळ पिकवली आहे, सहकाराच्या माध्यमांतुन अनेक संस्था निर्माण केल्या, कष्टाने संघर्षाचा इतिहास बदलवत अनेकांचे आयुष्य सुंदर केले आहे. त्यांनी जे केलं त्या विचारांची शिदोरी घेवुन पुढची पिढी ते करत आहे. बिपीनदादा कोल्हे,स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांचे कार्य देखील ऊर्जदायक सुरू असून सर्वांनी प्रेरणा घेऊन आपाआपल्या जबाबदारीचे प्रामाणिक पालन करणे हा संकल्प मनाशी करावा असेही शेवटी

जाहिरात
जाहिरात

म्हणाले.याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले,जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी,कामगार नेते मनोहर शिंदे, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी,अधिकारी विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देहु नगरपालिकेचे नगराध्यक्ष स्वप्नील काळोखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर यादव, प्रसिध्द कवी डॉ. स्वप्नील चौधरी यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करण्यांत आला. कारखाना कार्यस्थळावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सात दशकांचा चित्रात्मक प्रवास लावला होता. आमची प्रेरणा साहेब हया सेल्फी पॉईंटवर अनेकांनी सेल्फी घेतल्या. मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळयांची सजावट करण्यांत आली होती. रंगीबेरंगी फुगे लावण्यांत आले होते. संपुर्ण वातावरण स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवर्णीने भरून गेले होते. या कार्यक्रमाची अध्यक्षपदाची सूचना ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी मांडली त्याला अनुमोदन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे यांनी दिले.शेवटी आभार केन मॅनेजर जी बी शिंदे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे